Sunidhi Chauhan: बॉलीवुड गायिका सुनिधी चौहानने पहिल्यांदाच गायलं मराठी मालिकेचं शीर्षकगीत!

''चंद्रविलास''च्या शीर्षकगीतातून ऐकू येणार सुनिधीचा गोड आवाज..
singer Sunidhi Chauhan sing chandravilas marathi serial title song zee marathi
singer Sunidhi Chauhan sing chandravilas marathi serial title song zee marathisakal

Sunidhi Chauhan: वैभव मांगले, सागर देशमुख आणि आभा बोडस अभिनित 'चंद्रविलास' या आगामी मालिकेचे शीर्षकगीत नुकतेच बॉलीवूड ची सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुनिधी चौहान हिच्या मधुर स्वरांनी संगीतबद्ध करण्यात आले आहे.

सुनिधीने या आधी मराठी चित्रपटासाठी अनेकदा पार्श्वगायन केलेले आहे परंतू 'चंद्रविलास' च्या निमित्ताने सुनिधी प्रथमच एखाद्या मराठी मालिकेसाठी पार्श्वगायन करतेय. अमोल पाठारे यांच्या लेखणीतून अवतरलेलं आणि प्रणव हरिदास यांनी संगीतबद्ध केलेलं हे शीर्षकगीत गाताना सुनिधी खूप उत्साही होती.

(singer Sunidhi Chauhan sing chandravilas marathi serial title song zee marathi)

singer Sunidhi Chauhan sing chandravilas marathi serial title song zee marathi
Manasi Naik: मानसी नाईक देवीच्या दर्शनाला.. अंबे मातेकडे मागितली 'ही' इच्छा..

‘चंद्रविलास’ ही गोष्ट आहे दोनशे वर्षांपूर्वीच्या वास्तूची आणि त्यात अडकलेल्या बाप-लेकीची. अनंत महाजन आणि त्याची मुलगी शर्वरी गावातल्या एका जुन्या वाड्यात जातात आणि तिथे अडकून पडतात.

ते दोघं तिथे पोहोचल्यापासून अनाकलनीय घटनांची एक मालिकाच सुरू होते. या घटनांमागे असतो, या वास्तूत गेल्या दोनशे वर्षांपासून वास्तव्याला असलेला एक आत्मा. त्या आत्म्याला नेमकं काय हवंय, त्यानं कोणत्या उद्देशानं या दोघा बाप लेकीला त्या वाड्यात अडकवून ठेवलंय, त्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो आत्मा कोणकोणत्या गोष्टी घडवून आणणार आहे, या सगळ्या दरम्यान त्यांना आणखी कोण-कोण भेटणार आहे आणि त्या आत्म्याच्या तावडीतून सुटण्यासाठी त्या दोघांना कोणत्या दिव्यातून जावं लागणार आहे, ह्या सगळ्याचा उलगडा या मालिकेतून होणार आहे. येत्या २७ मार्चपासून ही मालिका आपल्या भेटीला येणार आहे.

बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला सर्वात लोकप्रिय गायिका म्हणून सुनिधी चौहानचे नाव घ्यावे लागेल. वयाच्या अवघ्या चार वर्षांपासून (social media vial news) सुनिधीनं गाणं गाण्यास सुरुवात केली होती. बॉलीवूडमधील सर्वात ख्यातनाम गायिका म्हणून सुनिधीनं आपली वेगळी छाप उमटवली आहे.

सुनिधीनं हिंदीच नाहीतर मराठी, पंजाबी, कन्नड, तेलुगू, आसामी, नेपाळी भाषेत गायन केलं आहे. तिनं आजवर अनेक मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे पण एका मराठी मालिकेसाठी ती पहिल्यांदाच गगायली आहे, त्यामुळे तिच्यासाठीही हा खूप खास अनुभव होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com