Sitaare Zameen Par: आमिरसोबत पहिल्यांदाच दिसणार ही अभिनेत्री, सितारे जमीन पर मधून होणार इंट्री!

लाल सिंग चढ्ढानं आमिरला मोठा धक्का बसला होता. त्याच्या यापूर्वीच्या कोणत्याही कलाकृतीनं त्याला इतके निराश केले नव्हते जेवढे लाल सिंग चढ्ढानं केले असे म्हटले जाते.
Sitaare Zameen Par Aamir Khan Bollywood
Sitaare Zameen Par Aamir Khan Bollywood esakal

Sitaare Zameen Par Aamir Khan bollywood : भलेही आमिरला लाल सिंग चढ्ढानं अपयश दिलं असलं तरी बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिरनं आता जोरदार कमबॅक करण्याचा निर्णय़ घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून आमिर हा एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे.

आमिरनं लाल सिंग चढ्ढानंतर त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली असून त्याचे नाव सितारे जमीन पर असे आहे. त्या चित्रपटातून बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आमिरसोबत दिसणार असल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. आमिरनं एका मुलाखतीमध्ये त्याच्या चित्रपटाविषयी सांगितले होते. त्यानंतर त्यात कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार याबाबत चर्चांना उधाण आले होते.

Also Read - Financial Planning: कसे सुधारायचे आपले आर्थिक आरोग्य....

लाल सिंग चढ्ढानं आमिरला मोठा धक्का बसला होता. त्याच्या यापूर्वीच्या कोणत्याही कलाकृतीनं त्याला इतके निराश केले नव्हते जेवढे लाल सिंग चढ्ढानं केले असे म्हटले जाते. नेटकऱ्यांनी त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले होते. खरं तर आमिरनं त्यावरुन माफीही मागितली होती. पण प्रेक्षकांनी लाल सिंग चढ्ढाला नकारात्मक प्रतिसाद दिला होता. आता पुन्हा एकदा आमिर खान त्याच्या नव्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे.

बॉलीवूडमध्ये आपल्या वेगळ्या सादरीकरणासाठी आमिर खान हा नेहमीच ओळखला गेला आहे. त्याच्या यापूर्वीच्या अनेक चित्रपटांतून त्यानं कथेची वेगळी मांडणी करत त्यातून मोठा संदेश देण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यामुळे चाहत्यांना आमिरच्या चित्रपटाची नेहमीच उत्सुकता असते. आता त्याच्या सितारे जमीन पर नावाच्या चित्रपटाचे चाहत्यांना वेध लागले आहे.

Sitaare Zameen Par Aamir Khan Bollywood
Aamir Khan Daughter Ira Wedding: 'माझा जावई हा....' सासरेबुवा होणाऱ्या आमिरनं काय सांगितलं माहितीये?

या सगळ्यात बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जेनिलिया डिसुजा ही आमिरच्या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून दिसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आमिरनं न्यूज १८ ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याच्या नव्या चित्रपटाविषयी सांगितले होते. २००७ मध्ये त्याचा तारे जमीन पर नावाचा चित्रपट आला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. पिंकव्हिलानं दिलेल्या एका रिपोर्टनुसार, आमिर खाननं जेनेलियाचे नाव सुचवल्याचे सांगण्यात येत आहे.

Sitaare Zameen Par Aamir Khan Bollywood
Aamir Khan: 'मला तुमची गाडी नकोच, मी यापुढे....' आमिर खानच्या मुलानं जुनैदनं स्पष्टपणेच सांगितलं

सितारे जमीन पर जेनेलिया मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही बातमी सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सितारे जमीन पर हा चित्रपट आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसकडून प्रदर्शित केला जाणार आहे. एक वर्षानंतर आमिर पुन्हा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com