सोहानं पाठवलं दिवंगत वडिलांना वाढदिवसाचं अनोख गिफ्ट;म्हणाली,'अब्बा...' Soha Ali khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Soha Ali khan,Kunal Khemu,Inaaya Khemu

सोहानं पाठवलं दिवंगत वडिलांना वाढदिवसाचं अनोख गिफ्ट;म्हणाली,'अब्बा...'

सोहा अली खान(Soha Ali Khan) नेहमीच पतौडी खानदानची मुलगी शोभून दिसली. मग ते तिनं केलेल्या सिनेमांमधील काम असो,कुटुंबाच्या मानात राहून बॉलीवूडमध्ये तिनं केलेलं वर्तन असो की अगदी कुटुंब सुरू झाल्यावर एक पत्नी म्हणून,आई म्हणून तिचं जबाबदार होणं असो...प्रत्येक गोष्ट स्पष्ट सर्वांनी पाहिलीय. कारण सेलिब्रिटींनी कितीही ठरवलं तरी ते प्रत्यक्ष आयुष्यात कधी,काय करतात हे फार लपून राहत नाही. तरीही अनेकजण बेताल वागतात हे सोडा. पण सोहा अली खाननं नेहमीच क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी अनं आई शर्मिला टागोर यांच्या नावाला कुठे धक्का बसेल असं कधीच काही केलेलं ऐकीवात नाही. लग्नानंतर तर ती पूर्ण कुटुंबात रमलेली दिसून येतेय. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिनं शेअर केलेल फोटो याचा दाखला म्हणता येईल.

हेही वाचा: कपिल शर्माची हिम्मत पहा;दारुच्या नशेत थेट मोदींना केलं ट्वीट...

नुकताच तिनं एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती,तिचा पती कुणाल खेमू,मुलगी इनाया खेमू दिसत आहेत. तिघे कुठल्यातरी सेलिब्रेशनसाठी एकत्र आले आहेत असं दिसतंय. हो खरंय. ते तिघे सोहाचे दिवंगत वडिल क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांच्या वाढदिवसानिमित्तानं एकत्र आले आहेत. मन्सूर अली खान यांचा हा ८१ वा वाढदिवस. वडिल आपल्यात नसले तरी सोहा मात्र दरवर्षी मोठ्या उत्साहानं त्यांचा वाढदिवस तिच्या घरी साजरा करते. यावेळी तिनं एक फ्लोटिंग लॅंटर्न वडिलांसाठी आकाशात पाठवला. या व्हिडीओत कुणाल खेमू तो लॅंटर्न उंच उडवताना दिसत आहे. तर सोहा अन् इनाया असे तिघे एकत्र आकाशात तरंगणा-या त्या लॅंटर्नकडे पाहताना दिसत आहेत. या व्हिडीओसोबत सोहाने वडिलांसाठी एक सुंदर पोस्ट शेअर केलीय. ती म्हणाली,''हॅप्पी बर्थ डे अब्बा. तुम्ही जिथे आहात तिथनं आमच्यावर लक्ष ठेवा,आमचं रक्षण करा''. तो व्हिडीओ आम्ही इथे जोडला आहे,आपल्याला पाहता येईल. दरवर्षी सोहा वडिलांसाठी त्यांच्या जन्मदिनी एक अनोख गिफ्ट तयार करते. गेल्यावर्षीही इनायाने तिच्या आजोबांसाठी ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं.

हेही वाचा: साराचा आई-वडिलांच्या घटस्फोटाविषयी धक्कादायक खुलासा...

सोहा सध्या बॉलीवूडपासनं अंतर ठेवून आहे. ती २०१८ मध्ये आपल्याला 'साहेब,बीवी और गॅंगस्टर' या सिनेमात दिसली होती. तिनं बॉलीवूडला राम-राम मात्र ठोकलेला नाही बरं का. ती कुटुंबाला वेळ देतेय पण आता पुन्हा ती कामही करताना दिसणार आहे. तिचा 'कौन बनेगी शिखरवती' ही कॉमेडी सिरीज आपल्या भेटीस येणार आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत नसिरुद्धिन शहा, लारा दत्ता,कृतिका कामराही आपल्याला दिसणार आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top