esakal | मिर्झापूरमधल्या 'धब्बा' कादंबरीचा वाद पेटला, पण...
sakal

बोलून बातमी शोधा

some controversy related dhabba novel in mirzapur second seson

धब्बा' कादंबरीचे लेखक सुरेंद्र मोहन पाठक यांनी मालिकेत आपल्या  कादंबरीचा उपयोग वेगळ्या अर्थाने केला गेल्याचा आरोप मिर्झापूरच्या निर्मात्यांवर केला होता.

मिर्झापूरमधल्या 'धब्बा' कादंबरीचा वाद पेटला, पण...

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  मिर्झापूर 2 ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यापासून त्या मालिकेमागे वाद सुरु झाला. त्यातील मुख्य कथानक, पात्रे, संवाद यावरुन मालिकेच्या निर्माते. दिग्दर्शक यांच्यावर टीका केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी भाजपच्या एका महिला खासदारानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यात या मालिकेवर बंदी घालावी असे म्हटले आहे. दुसरीकडे मालिकेतील एका भागात दाखविण्यात आलेल्या धब्बा' कादंबरीच्या संदर्भावरुनही नव्या वादाला सुरुवात झाली आहे. 

धब्बा' कादंबरीचे लेखक सुरेंद्र मोहन पाठक यांनी मालिकेत आपल्या  कादंबरीचा उपयोग वेगळ्या अर्थाने केला गेल्याचा आरोप मिर्झापूरच्या निर्मात्यांवर केला होता. त्यावरुन निर्मात्यांनी त्यांची माफी मागितली आहे. त्या मालिकेमध्ये माझी कादंबरी वाचत असल्याचे दृश्य का दाखविण्यात आले याचा मला उलगडा झाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे आपण मिर्झापूर मालिकेच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली. निर्मात्यांच्या अशाप्रकारच्या वागण्यामुळे आपली प्रतिमा मलिन करण्यात आल्याचे पाठक यांचे म्हणणे आहे. रितेश सिधवानी, फरहान अख्तर यांनी मिर्झापूर 2 या मालिकेची निर्मिती केली आहे.

 निर्मात्यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या पत्रामध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे की, सुरेंद्र पाठक आपण पाठविलेली नोटीस आम्हाला प्राप्त झाली. त्यात केलेले आरोपही वाचले. मालिकेतील एका प्रसंगात सत्यानंद त्रिपाठी नावाचे पात्र हे आपली धब्बा' कादंबरी वाचत असतानाचे दृश्य चित्रित करण्यात आले आहे. ती कादंबरी आपण लिहिली आहे. त्यावेळी जो व्हॉईस ओव्हर वापरण्यात आला आहे त्यामुळे आपल्या वाचकांमध्ये नाराजी पसरल्याचे कळले. झालेल्या सर्व प्रकारासाठी आम्ही आपली माफी मागतो.

 कुठल्याही प्रकारे आपल्या प्रतिमेला धक्का लागेल अशाप्रकारची कृती आम्ही जाणीवपूर्वक केलेली नाही. आपण एक मान्यवर लेखक आहात. तसेच हिंदी साहित्यसृष्टीमध्ये आपले असलेले स्थान प्रेरणादायी व महत्वपूर्ण आहे. आमच्याकडून जी चूक झाली आहे ती नक्की सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल. असे आश्वासनही निर्मात्यांकडून देण्यात आले आहे. संबंधित दृश्यामध्ये जो व्हाईस ओव्हर आहे तो काढून टाकण्यात येईल असेही पाठक यांना सांगण्यात आले आहे. 
 
 
 
 
  

loading image