Sonalee Kulkarni : नटरंग फेम सोनाली कुलकर्णी आता 'साऊथ'मध्ये झळकणार! 'मलाइकोट्टाई वालिबान' मधून मिळणार संधी

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं तिच्या चाहत्यांना एक मोठं (Sonalee Kulkarni Latest News) गिफ्ट दिलं आहे.
Sonalee Kulkarni Marathi Actress now entry South Industry
Sonalee Kulkarni Marathi Actress now entry South Industry esakal

Sonalee Kulkarni Marathi Actress now entry South Industry : प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं तिच्या चाहत्यांना एक मोठं (Sonalee Kulkarni Latest News) गिफ्ट दिलं आहे. ती आता लवकरच साऊथ चित्रपटामध्ये दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून सोनालीनं तिच्या चित्रपटांमधून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणून नेहमीच सोनालीकडे पाहिले गेले आहे. मराठी आणि बॉलिवूडमध्ये आपले अभिनयकौशल्य दाखवल्यानंतर (Sonalee Kulkarni South Film Industry) आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातून आपली अदाकारी दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित 'मलाइकोट्टाई वालिबान' या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. यात सोनाली सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

या चित्रपटातील एका गाण्याच्या माध्यमातून तिचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आला असून या फ्युजन लावणीत सोनालीची बहारदार अदा पाहायला मिळत आहे. आपल्या मनमोहक नृत्यदाकारीने सोनाली दक्षिणेतील प्रेक्षकांनाही घायाळ करणार असून महाराष्ट्राची ओळख असलेले लावणी नृत्य आता सोनाली दक्षिणात्य चित्रपटात गाजवणार आहे.

सोनाली कुलकर्णी म्हणते, '' हा माझा पहिलाच मल्याळम चित्रपट आहे. पहिल्याच चित्रपटात अशा दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली, खूप आनंदाची गोष्ट आहे. आज या गाण्याच्या माध्यमातून माझ्या लूकवरील पडदा अखेर उठला आहे. जगभरात प्रदर्शित (Malaikottai Vaaliban ) होणारा हा चित्रपट तामिळ, तेलुगू, कन्नड मध्ये २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे तर त्याच्या पुढील आठवड्यात हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट युके, युएस, कॅनडासह अनेक देशांमध्ये प्रदर्शित होणार असून कॅनडामध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला भव्य प्रादेशिक चित्रपट आहे. माझ्यासाठी हा एक खास अनुभव आहे. प्रेक्षक मला या नवीन व्यक्तिरेखेत स्वीकारतील, याची खात्री आहे.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com