अप्सरेचा पतिराजांसोबतचा भन्नाट डान्स पाहिलात का? Sonalee Kulkarni | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonalee Kulkarni with Her Husband Kunal

अप्सरेचा पतिराजांसोबतचा भन्नाट डान्स पाहिलात का?

सोनाली कुलकर्णी(Sonalee Kulkarni) सध्या फॉर्मात आहे हे वेगळं सांगायला नको. तिचे प्रदर्शित झालेले 'झिम्मा' आणि 'पांडू' या दोन सिनेमांनी बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली. झिम्माला तर 'सुपरहिट' म्हणूनही घोषित केलं गेलं. आता दोन्ही सिनेमातील सोनालीच्या व्यक्तीरेखा अगदी दोन टोकाच्या. 'झिम्मा'त दिसलेल्या सोनालीनं अल्ट्रामॉर्डन लूकनं आणि 'पांडू'त दिसलेल्या तिच्या गावरान लूकनं चाहत्यांना घायाळ केलं एवढं मात्र नक्की. सध्या ती बॅक टू बॅक सिनेमाच्या शूटिंगमध्ये-प्रमोशनमध्ये बिझी होती. पण त्यातूनही तिनं वेळ काढत आपल्या कुटुंबासोबत एन्जॉय करण्याला प्राधान्य दिलंय.

हेही वाचा: 'तिखट मीरी' मीरा जगन्नाथनं केली घरातल्या प्रत्येकाची पोल खोल...

सोनाली आणि तिचा नवरा कुणाल यांची ही धम्माल डान्स रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोनाली पुण्याची. कामानिमित्तानं मुंबईत राहणारी,तिचा नवरा कामानिमित्तानं दुबईत राहणारा तर तिचे सासु-सासरे लंडनमध्ये राहतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तिचं सासर लंडनचं. त्यात लॉकडाऊनमध्ये अगदी घाई-घाईत दुबईत सोनालीनं अगदी मोजक्याच कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न उरकलं. ज्या लग्नाला तिचे सासु-सासरे हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे आता सोनाली पहिल्यांदा आपल्या सासरी गृहप्रवेशासाठी लंडनला गेलीय . तिथे जाण्यासाठी तिनं निमित्त साधलं ख्रिसमस सेलिब्रेशनचे. त्यात लंडनमधल्या ख्रिसमसचा थाट काही औरच. सोनाली तिच्या सोशल मीडियावर सासरच्यांसोबत रमलेली पहायला मिळतेय ते तिनं पोस्ट केलेल्या फोटोमधून कळतंय.

हेही वाचा: 'तिखट मीरी' मीरा जगन्नाथनं केली घरातल्या प्रत्येकाची पोल खोल...

पण आता आणखी एक धम्माल आपण पाहणार आहात ते म्हणजे नृत्यात पारंगत असलेल्या सोनालीनं आपल्या नव-यालाही डान्स करायला भाग पाडलंय. ही डान्सिंग रील तिनं सोशल मीडियावर शेअर केली आहे. पांडू मधील 'बुर्र्म,बुर्र्म' या गाण्यावर दोघांनी तुफान डान्स केलाय. याची एक झलक आम्ही इथे दिलेली आहे. नक्की पहा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top