सोनाली बेंद्रेचा 'हा' फोटो पाहून चाहत्यांना फ्रेंडशिप दिनी धक्का!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

या फोटोत तिच्यासोबत मैत्रीणी गायत्री ओबेरॉय आणि सुझेन खान या दिसत आहेत. न्युयॉर्क मधील कॅफेच्या बाहेर बसुन या तिघींनी पोझ दिली.

सोनाली बेंद्रे सध्या कर्करोगाशी झुंजत आहे. न्युयॉर्क येथे ती उपचार घेत आहे. किमोथेरपीमुळे तीने मध्यंतरीच्या काळात केलेल्या हेअरकटचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. आता असाच तिचा आणखी एक फोटो ट्रेंडिगमध्ये आहे. निमित्त आहे फ्रेंडशिप डेचं.

या फोटोत तिच्यासोबत मैत्रीणी गायत्री ओबेरॉय आणि सुझेन खान या दिसत आहेत. न्युयॉर्क मधील कॅफेच्या बाहेर बसुन या तिघींनी पोझ दिली. सोनालीवर कर्करोगावरील उपचाराचा परिणाम दिसून येत आहे. सोनालीचं टक्कल पडलं आहे. तिच्या तब्येतीवरही उपचारामुळे झालेला परिणाम या फोटोत बघून कळून येत आहे.

हा फोटो सोनालीने ट्विट करत या सोबत फ्रेंडशिप डे बद्दल एक पोस्टही लिहीली आहे. 'या क्षणी लोक मला मी खुश आहे म्हटल्यावर विचित्र नजरेने बघतात. पण हे खरे आहे की मी आनंदात आहे आणि त्याचं कारण म्हणजे, मी आता प्रत्येक क्षण, येणारी संधी यात आनंद शोधत आवर्जुन त्याकडे लक्षं देत आहे. हे खरे आहे की काही क्षण माझ्यासाठी वेदनांचे असतात. पण मी सध्या मला आवडेल ते करत आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्यां लोकांसोबत मी वेळ घालवते आहे. मी माझ्या मित्रमैत्रींणींचे खुप आभारी आहे. ते माझे आधारस्तंभ आहे. जे या क्षणी माझ्यासाठी इथे आहेत आणि या सगळ्यातून मला बाहेर येण्यास मदत करत आहे. त्यांच्या व्यस्त जीवनीतून ते माझ्यासाठी कॉल, मेसेज, भेट या माध्यमांतून वेळ काढत आहे. मला एकटं वाटेल असा एकही क्षण ते येऊ देत नाहीत. मी त्यांचे आभारी आहे की त्यांनी मला खरी मैत्री दाखवली. हॅपी फ्रेंडशिप डे.' ह्रतिक रोशन याने हा फोटो कॅमेरात कैद केला आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonali Bendre Celebrates Friendship Day At New York