सोनाली म्हणते तिची आई 'हिरकणी'

sonali kulkarni with her mother
sonali kulkarni with her mother

मुंबई : प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित 'हिरकणी' सिनेमाच्या टीझरने अक्षरश: अंगावर शहारे येतात. सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे आपल्या तान्ह्या बाळाला भेटण्यासाठी व्याकूळ असलेली आई हिरकणीची झलक पाहून अनेकांची या सिनेमा प्रती उत्सुकता वाढली आहे. हिरकणीच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देत सोनाली या रोलसाठी साजेशी दिसत आहे. मात्र सोनालीसाठी तिची आईच खरी हिरकणी असल्याचं तिने सांगितलं आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आईविषयी खास पोस्ट शेअर केली आहे. आईसोबतचा फोटो शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तीला पाहिल्यानंतर मनात प्रश्न येतो, कुठून येत असेल इतकी जिद्द? कसं सांभाळत असेल ती आम्हा सगळ्यांना ? कितीही संकटं आली तरी तिचं खंबीर हसू कायम उभारी देतं. कुटुंबासाठी आजही असे सगळे अवघड कडे सहजपणे उतरणारी #माझीहिरकणी म्हणजे माझी आई. कोण आहे तुमची हिरकणी? तिच्या बरोबर तुमचा फोटो #MajhiHirkani टॅग वापरून नक्की पोस्ट करा. #Hirkani'. 

तुमच्या आयुष्यात कोणती हिरकणी आहे असा सवाल सोनालीने चाहत्यांना केला आहे. शिवाय त्या व्यक्तीसोबतचा फोटो शेअर करुन #MajhiHirkani हा हॅशटॅग वापरायचं आवाहनही केलं आहे. अनोख्या पद्धतीने चित्रपटाचं प्रमोशन करत सोनालीने चाहत्यांनाही यामध्ये सहभागी करुन घेतलं आहे. 
'हिरकणी' चित्रपटामध्ये जीवा या व्यक्तीरेखेची भूमिका अभिनेता अमित खेडेकर याने साकारली आहे. सोनाली कुलकर्णी आणि अमित यांची जोडी     प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. या नवीन जोडीवर आणि त्यांच्या प्रेमकथेवर आधारीत असलेलं गाणं नुकतचं प्रदर्शित झालं असून 'जगन हे न्यारं झालं जी' असे गाण्याचे बोल आहेत. विशेष म्हणजे अभिनेता विकी कौशलने हे गाणं ट्विटरवर रिलिज केले आणि हिरकणीच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' सिनेमाची निर्मिती इरादा एंटरटेनमेंट फाल्गुनी पटेल आणि सहनिर्मिती लॉरेन्ल डिसुझा यांनी केली आहे. राजेश मापुस्कर हे सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. येत्या दिवाळीत 24 ऑक्टोबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com