अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने डान्सबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 24 December 2020

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा मराठी बाणा जागृत झाला आहे. सोनालीने तिच्या नृत्य करिअरमधील हा सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : 'अप्सरा आली....' या गाण्याने सगळ्या प्रेक्षकांवर मोहिनी टाकलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने डान्सबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.  सगळ्या प्रेक्षकांना तिच्या दिलखेच अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा मराठी बाणा जागृत झाला आहे. सोनालीने तिच्या नृत्य करिअरमधील हा सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची सध्या चाहत्यांमध्ये तुफान चर्चा आहे.

हे ही वाचा: फोन करुन 'त्याने' अभिनेत्रीला घातला हजारो रुपयांचा गंडा     

सोनाली कुलकर्णी झी मराठीवरील 'डान्सिंग क्वीन साईज लार्ज-फुलचार्ज'चा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणारे. या सेटवर सोनालीने एक महत्वाचा निर्णय घेतला. सोनाली कुलकर्णी शक्यतो मराठी कार्यक्रमात हिंदी गाण्यांवर नृत्य करणार नाही. हे सोनालीला खूप मनापासून वाटत आहे. आणि ती ही गोष्ट फॉलो करत आहे. सोनालीने नुकत्याच पार पाडलेल्या डान्सिंग क्वीन कार्यक्रमात आपल्या मराठी गाण्यांवर नव्या पद्धतीने परफॉर्म केलं आहे.

सोनाली कुलकर्णी नुकतीच लंडनहून परतली आहे. सोनाली तिच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगकरता लंडनमध्ये गेली होती. या सिनेमात सोनाली कुलकर्णीसोबत हेमंत ढोमे, संतोष जुवेकर आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन लोकेश गुप्ते करत असून अमेय खोपकर, स्वाती खोपकर हे निर्माते आहेत. सोनाली लंडनहून परतल्यानंतर 'डान्सिंग क्वीन'मध्ये दिसणार आहे.

सोनाली कुलकर्णी आपल्या अभिनय, नृत्यासोबत पॉडकास्टद्वारे तिच्या भावना प्रेक्षकांसमोर व्यक्त करत असते. सध्या सोनालीच्या पॉडकास्टला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोनालीचं हे मराठी प्रेम पाहून अनेकांचा उर अभिमानाने भरुन आला आहे. त्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं आहे. 
  

sonali kulkarni marathi bana made a big decision about dance 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sonali kulkarni marathi bana made a big decision about dance