Sonali Phogat : मृत्यूपूर्वी नेमकं काय झालं, बहिणीने सांगितला घटनाक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonali Phogat Passed Away

Sonali Phogat : मृत्यूपूर्वी नेमकं काय झालं, बहिणीने सांगितला घटनाक्रम

Sonali Phogat Death : भाजपच्या नेत्या आणि टिकटॉक स्टार असलेल्या सोनाली फोगटच्या मृत्युच्या एका दिवसानंतर तिची बहीण रमनने सोनालीच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. तसेच सोनालीला हार्टअटॅक येऊच शकत नाही कारण ती एकदम फिट होती. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कसा झाला याच्या चौकशीसाठी सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे गोवा पोलिसांनी फोगट यांच्या मृत्यूची नोंद अनैसर्गिक असल्याची नोंद केली आहे.

तर, सोनाली यांच्या दुसरी बहीण रूपेशने एएनआयला सांगितले की, मृत्यूच्या काहीवेळ आधी सोनालीचा संध्याकाळी आपल्याला फोन आला होता. त्यावेळी तिने मला तुझ्याशी व्हॉट्सअॅपवर बोलायचे असल्याचे सांगितले होते. मात्र, तिला फोन केला असता तिने तो कट केला आणि त्यानंतर तिने कोणतेच फोन उचलेले नाही.

दरम्यान, सोनाली फोगटचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून, आज तिचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. पोस्टमार्टमनंतरच सोनाली फोगटच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सोनाली फोगट तिच्या काही कर्मचाऱ्यांसोबत गोव्याच्या दौऱ्यावर होती असे सांगण्यात येत आहे. सोनालीने अंजुनाच्या 'कर्ले' रेस्टॉरंटमध्ये अस्वस्थ असल्याची तक्रार केली. यानंतर तिला उत्तर गोवा जिल्ह्यातील अंजुना येथील सेंट अँथनी रुग्णालयात नेण्यात आले.

Web Title: Sonali Phogat Death Post Mortem Today Sister Said I Received A Call From Her The Evening Before Her Death

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :EntertainmentPost Mortem