सोनम-दलकरचा 'द जोया फॅक्टर' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला!

वृत्तसंस्था
Thursday, 29 August 2019

बॉलिवुडची अभिनेत्री सोनम कपूर आणि साऊथॉचा हिरो दुलकर सलमान यांच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'दि जोया फॅक्टर' असं या चित्रपटाचं नाव असून त्याची कथा जबरदस्त आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि साऊथचा हिरो दलकर सलमान यांच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'दि जोया फॅक्टर' असं या चित्रपटाचं नाव असून त्याची कथा जबरदस्त आहे. काही दिवसांपासून सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात येणार अशा बातम्या येत होत्या. मात्र, अखेर बऱ्याच प्रलंबनानंतर सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

कथा थोडीशी हटके असून सोनमला लकी चार्मपासून थेट देवी बनल्याचं दाखवण्यात आलं आहे. 1983 मध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषक आणि त्याच्याशी संबंधित असलेलं लकी चार्म प्रकरण यावर आधारीत असणारा हा चित्रपट आहे. ट्रेलर आल्यानंतर आता मात्र सोनमपेक्षा सर्वत्र चर्चा आणि कौतुक केलं जात आहे ते दलकर सलमानचं. 

'द जोया फॅक्टर' ही सोलंकी नावाच्या मुलीची कथा आहे. एक अशी मुलगी स्वत:ला कमनशिबी मानत असते. मात्र, तिचे वडील तिला क्रिकेटसाठी नशीबवान मानत असतात. तिचं असं नशीबवान असण्याचं कारण आहे तिचा जन्मदिवस. 

एका नव्या जोडीसह हा सिनेमा 20 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केलं असून निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओने केली आहे. चित्रपट अनुजा चौहान यांच्या कांदबरीवर आधारीत आहे. सोनम कपूरचे काका संजय कपूर हे सिनेमात सोनमच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonam Kapoor and Dulquer Salmaans The Zoya Factor trailor launched today