Sonu Nigam Attack: सोनू निगमला वाचवणारा रब्बानी खान आहे तरी कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonu Nigam Attack

Sonu Nigam Attack: सोनू निगमला वाचवणारा रब्बानी खान आहे तरी कोण?

बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. मुंबईतील चेंबूर येथे त्याच्या कॉन्सर्ट दरम्यान त्यावर हल्ला झाला. त्यानंतर बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली. त्याचा परफॉर्मन्स झाल्यानंतर तो स्टेजवरुन खाली येत असताना अचानक त्याला आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नील यानं त्याला धक्काबुक्की केल्याचं बोललं गेलं आहे.

शिवसेनेच्या आमदाराच्या मुलानं आधी त्याच्या टीमशी गैरवर्तन केले आणि नंतर सोनू निगमला मारहाण केली. आली. त्यात तो तोल जाऊन पडला. या घटनेमध्ये सोनूला किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान सोनू निगमला वाचवण्यासाठी त्याचा मित्र रब्बानी खान पुढे आला. या हल्ल्यात त्याने सोनू निगमला वाचवले, मात्र तो स्वत: जखमी झाला आहे. अशा परिस्थितीत सोनू निगमला हल्ल्यातून वाचवणारी ही व्यक्ती कोण आहे होती असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

तर रब्बानी मुस्तफा खान हा सोनू निगमचा जवळचा मित्र आणि बॉलिवूड गायक आहे. या घटनेवेळी सोनू निगमसोबत रब्बानीही उपस्थित होते. गायक सोनू निगमसोबत सेल्फी घेण्यासाठी जेव्हा त्याला ढकलण्यात आले तेव्हा रब्बानी याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तो स्वतः पायऱ्यांवरून खाली पडला. या हल्ल्यात रब्बानीला दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला.

रब्बानी मुस्तफा खान हा प्रसिद्ध गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचा मुलगा आहे. जो त्यांच्या गायकीचा वारसा पुढे नेत आहेत. रब्बानी यांने 'सरबजीत' चित्रपटातील ‘अल्लाह हू अल्लाह’आणि 'फौजी कॉलिंग' चित्रपटातील ‘पीर मेरी पिया जाने ना’ हे गाणे गायले आहे. या दोन्ही गाण्यांनी त्यांना संगीतविश्वात ओळख मिळवून दिली.