कुंभमेळ्याच्या आयोजनावरुन सोनू निगमचं मोठं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sonu nigam

कुंभमेळ्याच्या आयोजनावरुन सोनू निगमचं मोठं विधान

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना बुधवारी हजारो साधूंनी हरिद्वारमधील हर की पैरी इथं गंगा नदीत कुंभमेळ्यातील तिसरं शाहीस्नान केलं. कोरोनासंबंधित नियमांची पायमल्ली करून दुसऱ्या शाहीस्नानालाही साधूंसह भाविकांनी गर्दी केली होती. प्रसिद्ध गायक सोनू निगमने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत कुंभमेळ्याचं आयोजन व्हायला पाहिजे नव्हतं, असं मत व्यक्त केलं. यावेळी बहिणीच्या पतीलाही कोरोनाची लागण झाली असून ते आयसीयूत दाखल असल्याची माहिती त्याने दिली.

"कुंभमेळ्याचं आयोजन व्हायला पाहिजे नव्हतं"

"एक हिंदू म्हणून मला वाटतं की कुंभमेळ्याचं आयोजन व्हायला पाहिजे नव्हतं. सुदैवाने आता कुंभमेळ्यात प्रतीकात्मक सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हा लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे, मात्र सध्या जगभरात लोकांच्या प्राणाशिवाय अधिक काहीच महत्त्वाचं नाही. सध्याच्या परिस्थितीत कोणतेही शोज झाले नाही पाहिजेत आणि आयोजित केल्यास त्यात कडक नियम पाळण्यात यावेत", असं सोनू या व्हिडीओत म्हणाला. सोनू निगम सध्या गोव्यात असून १९ एप्रिल रोजी मुंबईला परतणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत आल्यानंतर सोनू काही दिवस क्वारंटाइनमध्ये राहणार आहे.

कुंभमेळ्यात प्रतीकात्मक सहभागी होण्याचं मोदींचं आवाहन

कोरोना संकटामुळे हरिद्वार इथल्या कुंभमेळ्यातील सहभाग प्रतिकात्मक ठेवण्यात यावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. असं केल्यामुळे कोरोना विरोधातील लढ्यास मोठी शक्ती मिळेल, असं मोदी यांनी ट्विट करत म्हटलं. मोदी यांच्या दूरध्वनीनंतर जुना आखाड्याचे स्वामी अवधेशानंद गिरी यांनी लोकांना मोठ्या संख्येने कुंभमेळ्यात स्नानासाठी न येण्याचं आवाहन केलं. स्वत:चे आणि इतरांचे प्राण वाचवणे ही पवित्र गोष्ट आहे असंही अवधेशानंद यांनी म्हटलं आहे.

Web Title: Sonu Nigam Said As A Hindu I Feel The Kumbh Mela Should Not Have Taken

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :sonu nigam