सोनू सूदने शेतक-याला भेट दिली म्हैस, म्हणाला 'पहिल्या कार खरेदीपेक्षाही जास्त उत्साही..'

sonu sood
sonu sood
Updated on

मुंबई- सोनू सूद सध्या लोकांसाठी देवदूतापेक्षा काही कमी नाही. त्याच्या मदतकार्यातून त्याने सगळ्यांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. त्याच्या कार्याला अनेकांनी सलाम केला आहे. लॉकडाऊन दरम्यान प्रवाश्यांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी त्याने सुरु केलेनं मदतकार्य आजही सुरुच आहे. आता तर त्याने एका व्यक्तिला म्हैस भेट दिली आहे.

एका युजरने ट्विट करत म्हटलं होतं की, 'चंपारणने पुरामध्ये त्याचा मुलगा आणि त्याची म्हैस गमावली आहे जी त्याच्या कमाईची एकमेव आशा होती. याची नुकसान भरपाई सोनू सूद आणि नीती गोयल यांच्याव्यतिरिक्त कोणी करु शकत नाही. त्यांना एक म्हैस उपलब्ध करुन द्या जेणेकरुन त्यांना जीवंत राहण्यासाठी त्यावरुन ते त्यांची कमाई सुरु ठेवू शकतील आणि त्यांच्या मुलांचं पालनपोषण करु शकतील.' 

या ट्विटवर रिप्लाय करत सोनूने म्हटलंय, 'मी एवढा उत्साही माझी पहिली कार खरेदी करतानाही झालो नव्हतो जेवढा मी तुमच्यासाठी म्हैस खरेदी करताना झालो. जेव्हा बिहारमध्ये येईन तेव्हा या म्हशीचं एक ग्लास ताजं दूध प्यायेन.'

याआधी सोनू सूदने गरजुंना ट्रॅक्टर पाठवणं, नवीन घर घेऊन देणं, रोजगार उपलब्ध करुन देणं अशा अनेक कौतुकास्पद गोष्टी केल्या आहेत. यासोबतंच त्याने केवळ भारतातंच नाही तर भारताबाहेरील लोकांनाही मदतीचा हात दिला आहे. सोनू सतत गरजुंना मदत करण्यासाठी पुढे सरसावत आहे. आसाम आणि बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर पुरामुळे नुकसान होत आहे. यामधील जितक्या लोकांना मदत करु शकतोय तितक्यांना सोनू मदतीचा हात देत आहे. त्याचं हे कार्य पाहुन अनेकांचा उर भरुन येत आहे.   

sonu sood buy buffalo for farmer more excited than buying his first car  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com