सोनू सूदने २० कोटींपेक्षा जास्त कर चुकवला- प्राप्तिकर विभाग

सलग तीन दिवस सोनू सूदच्या मालमत्तेची पाहणी प्राप्तिकर विभागाने केली.
actor sonu sood
actor sonu sood Team esakal

अभिनेता सोनू सूदने Sonu Sood २० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर चुकवला आहे, असं प्राप्तिकर विभागाने Income Tax Department निवेदनात स्पष्ट केलं आहे. सलग तीन दिवस सोनू सूदच्या मालमत्तेची पाहणी प्राप्तिकर विभागाने केली. बुधवारपासून शुक्रवारपर्यंत सोनू सूदच्या कार्यालयासह त्याच्याशी संबंधित सहा कंपन्यांची प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. सोनू सूदच्या कार्यालयात आर्थिक देवाणघेवाणीत अफरातफर झाल्याचं समजल्यामुळे ही पाहणी केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सोनू सूदवर सुरू झालेली ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोनू सूदला त्यांच्या एका कार्यक्रमाचा ब्रँड अँबेसेडर घोषित केल्याच्या दुसऱ्याच दिवशी प्राप्तिकर विभागाने ही कारवाई केली. सोनू सूद याने अद्याप कोणाही राजकीय पक्षाशी संबंध दाखवला नाही. तरीही केजरीवाल यांच्या भेटीनंतर तो पुढील वर्षी होणाऱ्या पंजाबमधील निवडणुका लढवेल, अशी चर्चा आहे. कोरोना साथीदरम्यान सोनू सूद याने सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर मदत केल्याने त्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले होते.

actor sonu sood
अभिनेता सोनु सूदची पत्नी किती कोटींची मालकीण?

सोनू सूद याने मागीलवर्षीच्या कोविड लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी जाण्यास मोठीच मदत केली होती. मजुरांना त्यांच्या गावी पोहोचण्यासाठी विमानाची तिकीटे देणे, वाहनांची व्यवस्था करणे, अन्य गरजूंना जेवण-शिधा, औषधे इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारे ऑक्सिजन देखील त्याने पुरवला होता. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असलेल्या दिल्ली राज्याने त्याला एका समाजोपयोगी कार्यक्रमासाठी आप सरकारचा ब्रँड अँबेसेडर घोषित केले आहे. त्यानुसार सोनू सूद विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी मार्गदर्शन करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com