Video : पोस्टरला दुग्धाभिषेक करताना पाहून सोनू सूद म्हणाला.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonu sood

Video : पोस्टरला दुग्धाभिषेक करताना पाहून सोनू सूद म्हणाला..

sakal_logo
By
स्वाती वेमूल

गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये आणि यावर्षी कोरोनाच्या कठीण काळात गरजूंची विविधप्रकारे मदत करणारा अभिनेता सोनू सूद Sonu Sood हा जणू 'देवदूत'च ठरला आहे. त्याने केलेल्या मदतीसाठी चाहत्यांकडून दिवसरात्र शुभेच्छा येतच असतात. नुकतंच काही चाहत्यांनी सोनू सूदच्या मोठ्या पोस्टरवर दुग्धाभिषेक केला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हाच व्हिडीओ सोनूनेही त्याच्या ट्विटरवर अकाऊंटवर शेअर करत 'विनम्र' असं कॅप्शन दिलं. (Sonu Sood says he feels humbled after fans pour milk on his life size poster)

आजपर्यंत अनेकदा दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक केल्याचेही अनेक व्हिडीओ पाहायला मिळाले. मात्र आता पहिल्यांदाच सोनू सूदच्याही पोस्टरवर दुग्धाभिषेक करत त्याचे अनोख्या प्रकारे आभार मानले आहेत.

हेही वाचा: 'हे आता मी खपवून घेणार नाही'; नेटकऱ्याच्या कमेंटवर भडकली सोनाली

आंध्रप्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात हा दुग्धाभिषेक करण्यात आल्याचं संबंधित ट्विटर युजरने म्हटलंय. 'कोरोनासारख्या कठीण काळात सोनू सूदने गरजूंची अनेकप्रकारे मदत केली. त्यामुळे लोकांकडून मिळत असलेलं हे प्रेमच आहे', असं एकाने लिहिलं. तर काहींनी कमेंट्समध्ये सोनूच्या कामाचं भरभरून कौतुक केलं आहे.

२०२० मध्ये लॉकडाउनमुळे अडकलेल्या गरीब मजुरांना, कामगारांना सोनू सूदने त्यांच्या गावी सुखरुप पोहोचवण्याचं काम केलं. आता सोनू सूद फाऊंडेशनच्या माध्यमातून तो गरजूंची विविधप्रकारे मदत करत आहे.

loading image
go to top