Sonu sood: सोनू सूदला सापडली नवी राणू मंडल, दिली थेट सिनेमात गाण्याची ऑफर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sonu sood tweet and offered a flim song for unknown women who sang mere naina sawan

Sonu sood: सोनू सूदला सापडली नवी राणू मंडल, दिली थेट सिनेमात गाण्याची ऑफर..

sonu sood बॉलिवूड अभिनेता सोनू सूद त्यांच्या अभिनयापेक्षा सामाजिक कार्यामुळे जास्त चर्चेत असतो. सोनू सूदने कोरोनाच्या काळात सुरू केलेली गरजूंना मदत करण्याची प्रक्रिया आजही सुरू आहे.

(sonu sood tweet and offered a flim song for unknown women who sang mere naina sawan)

आता त्याच्या घराबाहेरही अनेकदा शेकडो लोकांची गर्दी असते. सोनू सूद सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.असतो.आता त्यांचे एक ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

झालं असं की, एका व्हिडिओमध्ये महिला 'मेरे नैना सावन भादों' हे गाणे गात आहे. कुणालाही भुरळ घालेल असा हा आवाज आहे. सोनूलाही या महिलेचा आवाज खूप आवडला आहे.

हा व्हिडिओ रि-ट्विट करत अभिनेत्याने लिहिले आहे की, " यांचा नंबर द्या.. या माँ (आई) आता चित्रपटासाठी गातील.. " आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सर्वजण या महिलेच्या आवाजाचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा- ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

त्याचवेळी सोनू सूदने थेट ट्विटरवरच महिलेला गाणे गाण्याची ऑफरही दिली आहे. अभिनेत्याच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते खूप खूश झाले असून त्याचे कौतुक करत आहेत.

जो कोणी सोनू सूद कडे मदतीची याचना करतो, तो त्याला कधीही निराश करत नाही. या आधी देखील सोनू सूदने अनेकांना मदत केली आहे.

सोनू सुद लवकरच वास्तविक जीवनातील घटनांपासून प्रेरित, 'फतेह' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सूदचा कधीही न पाहिलेला अवतार दिसणार आहे

टॅग्स :Bollywood Newssonu sood