'सोनी मराठी' आजपासून घेऊन येतोय मनोरंजनाचा खजाना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

55 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार भव्य सोहळ्याच्या प्रक्षेपणाचे औचित्य साधून सोनी मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मनोरंजनाच्या या रोजच्या खजिन्याबरोबरच ही वाहिनी मराठी रसिकांसाठी दर्जेदार मराठी चित्रपटांचा संच देखील घेऊन येणार आहे.

मुंबई: सोनी समुहाने ‘सोनी मराठी’ चॅनेलची निर्मिती केली आहे. आजपासून (ता. 19 ऑगस्ट) हे चॅनेल प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. वैविध्यपूर्ण कथा आणि भक्कम विषय मांडणी असलेल्या 9 कथा मालिका (Fiction) आणि 2 कथाबाह्य कार्यक्रम (Non-Fiction) सोनी मराठी सुरवातीच्या काळात प्रेक्षकांना सुपूर्द करेल.

कथा मालिकांमध्ये ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘ह.म.बने तु.म.बने’, ‘सारे तुझ्याचसाठी’, ‘ती फुलराणी’, ‘दुनियादारी फिल्मी इष्टाईल’, ‘इयर डाउन’, ‘भेटी लागी जीवा’, ‘हृदयात वाजेसमथिंग’, ‘गर्जा महाराष्ट्र’ यांचा समावेश आहे. या मालिकांमध्ये नवीन आणि आजच्या काळाशी सुसंगत विषय हाताळलेले आहेत. तसेच ‘महाराष्ट्राचा फेवरेट डान्सर’ आणि
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हे कार्यक्रम प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन नक्कीच करतील. 55 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार भव्य सोहळ्याच्या प्रक्षेपणाचे औचित्य साधून सोनी मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मनोरंजनाच्या या रोजच्या खजिन्याबरोबरच ही वाहिनी मराठी रसिकांसाठी दर्जेदार मराठी चित्रपटांचा संच देखील घेऊन येणार आहे. सोनी मराठी सर्व मुख्य डायरेक्ट टू होम (DTH) आणि डिजिटल केबल प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असेल.

'एस्.पी.एन्' च्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या सोनी एन्टरटेन्मेंट चॅनेलची (एस्.ई.टीचे) प्रमुख निर्मिती संचालक म्हणून जबाबदारी पार पाडलेले अजय भाळवणकर हे आता ‘एस्.पी.एन्‘तर्फे लवकरच सुरू होणार्‍या ‘सोनी मराठी’ या मराठी वाहिनीचे व्यवसाय प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. सोनी पिक्चर्स नेटवर्क्सबरोबर 2014 सालापासून कार्यरत असणाऱ्या अजय यांनी यापूर्वी झी टीव्ही, म्युझिक एशिया अशा वाहिन्यांमध्ये विविध पदांवर काम केले असून मराठी आणि हिंदी वाहिन्यांच्या शुभारंभापासून ते चित्रपट निर्मिती आणि चित्रपट निर्मिती स्टुडिओ स्थापन करणे अशा अनेकविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sony Marathi New Entertainment Channel