एक स्त्री राहणार दोन पुरुषांसोबत? 'सोप्पं नसतं काही'मध्ये आगळीवेगळी कथा

मृण्मयी देशपांडे, शशांक केतकर आणि अभिजीत खांडकेकर यांच्या मुख्य भूमिका
एक स्त्री राहणार दोन पुरुषांसोबत? 'सोप्पं नसतं काही'मध्ये आगळीवेगळी कथा
Updated on

काळ बदलतो तसे समाजाचे आचारविचार बदलतात. जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवीन पिढीसोबत सामाजिक नियमात बदल होत जातात. काही वर्षांपूर्वी 'लिव्ह इन रिलेशनशिप' ही नवीन संकल्पना समोर आली होती. परदेशात या संकल्पनेचा सहजासहजी स्वीकार झाला. परंतु आपल्या समाजात ही संकल्पना पचनी पडायला थोडा अवधी लागला. नात्याचा असाच एक नवीन प्रकार पाश्चिमात्य देशांमध्ये प्रचलित आहे. तो म्हणजे 'पॉलीअ‍ॅमरी' Polyamory. एक स्त्री आणि एक पुरुष ही आपल्यासाठी जोडप्याची व्याख्या. परंतु 'पॉलीअ‍ॅमरी' संकल्पनेत दोन पुरुष आणि एक स्त्री किंवा दोन स्त्रिया आणि एक पुरुष असे एकत्र राहतात.

सामंजस्याने स्वीकारलेल्या या नात्याला आपला समाज किती मान्य करेल, हा एक चर्चेचा विषय असला तरी भारतीयांसाठी हा प्रकार काही नवीन नाही. कारण भारतीय महाकाव्यांपैकी एक असलेल्या महाभारतात द्रौपदीला पाच पती होते. त्यामुळे ही संकल्पना फार आधीपासूनच आपल्याकडे प्रचलित आहे. याच 'पॉलीअ‍ॅमरी' संकल्पनेवर आधारित एक नवीकोरी वेब सीरिज 'प्लॅनेट मराठी ओटीटी' प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. मयुरेश जोशी दिग्दर्शित 'सोप्पं नसतं काही' Soppa Nasta Kahi या वेब सीरिजमध्ये मृण्मयी देशपांडे, शशांक केतकर आणि अभिजीत खांडकेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

एक स्त्री राहणार दोन पुरुषांसोबत? 'सोप्पं नसतं काही'मध्ये आगळीवेगळी कथा
गोड न बोलता थेट व्यक्त होतो याचा मला अभिमान- शशांक केतकर

'सोप्पं नसतं काही'चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून यात मृण्मयीच्या आयुष्यात शशांक आणि अभिजीत असे दोन पुरुष दिसत आहेत. त्यांच्या आयुष्यात नेमके काय होते? आता मृण्मयी या दोघांबरोबर राहणार का? की आणखी काही पर्याय निवडणार, याची उत्तरे प्रेक्षकांना वेब सीरिज पाहिल्यावरच मिळतील.

वेब सीरिजमध्ये हा वेगळा विषय हाताळण्याविषयी 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' या वेब सीरिजचा विषय आजपर्यंत मराठीत कधीही हाताळण्यात आलेला नाही. मुळात आपले मराठी प्रेक्षक खूपच चोखंदळ आहेत. नवनवीन विषयांचा ते नेहमीच स्वीकार करतात. त्यामुळे हा एक वेगळा विषयही ते नक्कीच स्वीकारतील.'' 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर ३१ ऑगस्टपासून 'सोप्पं नसतं काही' ही वेब सीरिज प्रेक्षकांना पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com