esakal | सिद्धार्थ शुक्लाचं निधन; नेटकऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली दाक्षिणात्य सिद्धार्थला
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धार्थ शुक्लाचं निधन; नेटकऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली दाक्षिणात्य सिद्धार्थला

सिद्धार्थ शुक्लाचं निधन; नेटकऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली दाक्षिणात्य सिद्धार्थला

sakal_logo
By
स्वाती वेमूल

छोट्या पडद्यावरील 'बालिका वधू' या यशस्वी मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला Sidharth Shukla याचे गुरुवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या अवघ्या चाळिसाव्या वर्षी सिद्धार्थसारख्या कलाकाराचा अकाली ओढवलेला मृत्यू त्याच्या चाहत्यांसह इंडस्ट्रीतील सहकलाकारांनाही चटका लावून जाणारा ठरला. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला. मात्र हे करताना काहींनी सिद्धार्थ शुक्लाऐवजी दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थला Siddharth श्रद्धांजली वाहिली. 'रंग दे बसंती' चित्रपटात भूमिका साकारून बॉलिवूडमध्येही छाप सोडणाऱ्या दाक्षिणात्य सिद्धार्थचे फोटो पोस्ट करून काही नेटकऱ्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. यावर स्वत: सिद्धार्थने ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

'हे ट्विट आणि त्यावरील रिप्लाय पाहून आजकाल आपल्याला कोणत्याच गोष्टीचं आश्चर्य वाटू शकत नाही. मी नि:शब्द झालोय,' असं त्याने एका ट्विटमध्ये म्हटलंय. दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्याने लिहिलं, 'जाणूनबुजून हा द्वेष पसरवला जात आहे आणि छळ केला जातोय. अजून आपण किती खालच्या पातळीला जाणार?'

हेही वाचा: सिद्धार्थच्या निधनाचे वृत्त कळताच शहनाज गिलने सोडलं शूटिंग

गुरुवारी सकाळी दहानंतर सिद्धार्थला जुहू इथल्या कूपर रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच निधन झाल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. पोलीस पंचनामा आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण होण्यास लागलेला विलंब यामुळे सिद्धार्थच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सिद्धार्थच्या पश्चात त्याची आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे. सिद्धार्थ 'बिग बॉस'च्या तेराव्या पर्वाचा विजेता होता.

loading image
go to top