
चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर यशच्या चाहत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘केजीएफ 2’च्या रिलीजच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यासाठी पत्र लिहिले आहे.
मुंबई - साऊथ मधील प्रेक्षक चित्रपटांचे निस्सीम चाहते आहेत. हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. ते आपल्या आवडीच्या चित्रपटांसाठी, त्यातील अभिनेत्यासाठी काहीही करु शकतील. याची प्रचिती देणारे अनेक दाखले आपल्याला सोशल मीडियावर पाहायला, वाचायला मिळतील. तिकडे आवडत्या अभिनेत्याचा चित्रपट प्रदर्शित होतो आहे असे समजल्यावर त्याच्या फोटोला दुधाचा अभिषेक घातला जातो. केक कापून आनंद साजरा केला जातो. सध्या चर्चा यशच्या केजीएफ चित्रपटाची सुरु असून त्याच्या प्रदर्शनाच्या दिवशी एक आगळी वेगळी मागणी साऊथच्या प्रेक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींजींकडे केली आहे.
हेही वाचा : 'जली ना, तेरी जली ना?'; पॉपस्टार रिहानाशी 'पंगा' घेणाऱ्या कंगनावर भन्नाट मीम्स व्हायरल
'KGF 2' मध्ये यशनं प्रमुख भूमिका साकारली आहे. त्याच्या चाहत्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून KGF 2 च्या रिलीजच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली आहे. 'केजीएफ 2' हा चित्रपट 16 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. आतापर्यत त्याच्या टीझर, प्रोमोला मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळाली होती. गेल्या तीन वर्षांपासून केजीएफच्या दुस-या भागाची प्रतिक्षा चाहते करताना दिसत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर यशच्या चाहत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘केजीएफ 2’च्या रिलीजच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यासाठी पत्र लिहिले आहे.
यशचा केजीएफ 2 हा चित्रपट 16 जुलै 2021 रोजी प्रदर्शित होत आहे. हे चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, म्हणून आम्ही आपणास त्या दिवशी राष्ट्रीय सुटी जाहीर करण्यासाठी विनंती करीत आहोत. आमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा फक्त एक चित्रपट नाही तर ती एक भावना आहे," असे या पत्रात म्हटले गेले आहे. केजीएफ 2 हा पॅन इंडिया प्रोजेक्ट आहे. कारण तो हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होईल. या चित्रपटात श्रीनिधी शेट्टी, संजय दत्त, रवीना टंडन, अनंत नाग, नागभरन, प्रकाश राज, मालविका अविनाश, अच्युत कुमार आणि अर्चना जोइस मुख्य भूमिकेत आहेत.
हेही वाचा : वहिदाजींनी दिली अमिताभ यांच्या कानाखाली; खरं कारण वेगळचं
प्रशांत नील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यश आणि संजय दत्त या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. केजीएफची क्रेझ एवढी प्रचंड आहे की, त्याच्या चाहत्यांनी थेट मोदींकडे सुट्टीची मागणी केली आहे. आता मोदी यावर काय निर्णय घेतात ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अशा काही प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत . पंतप्रधानांना लिहिलेले पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केजीएफ 2 या चित्रपटाचा टीझर प्रचंड लोकप्रिय झाला होता.
हेही वाचा : चाहता म्हणाला न्यूड फोटो पाठव; पूजा हेगडेने पोस्ट केला चक्क 'हा' फोटो