esakal | विजय सेथुपती 'मेरी ख्रिसमस' साठी पुण्यात

बोलून बातमी शोधा

south superstar vijay sethupathi debut and katrina kaif upcoming thriller movie will be shoot in pune name merry christmas-}

सगळयांना या चित्रपटाचे नाव काय असणार याची उत्सुकता लागली आहे. सोशल मीडियावर विजयच्या चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे.

विजय सेथुपती 'मेरी ख्रिसमस' साठी पुण्यात
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - प्रसिध्द अभिनेता आमीर खानच्या लाल चढ्ढा सिंग या चित्रपटात साऊथचा सुपस्टार विजय सेथुपती काम करणार होता अशी चर्चा होती. विजयचा तो पहिला चित्रपट झाला असता जर त्यानं त्या चित्रपटात काम करायला तयारी दर्शवली असती. मात्र तसे झाले नाही. आमीर त्याला स्क्रिप्ट वाचून दाखविण्यासाठी खास तामिळनाडूला गेला होता. विजयच्या तारखांचे आणि लाल चढ्ढा सिंगच्या चित्रिकरणाचे गणित काही जमेना म्हणून त्याला त्या प्रोजेक्टमधून माघार घ्यावी लागली आहे.

आता विजय पुन्हा एकदा दुस-या चित्रपटाच्या माध्यमातून कमबॅक करण्यासाठी तयार आहे. विशेष म्हणजे त्याच्या या चित्रपटाची शुटिंग ही पुण्यात होणार आहे. कॅटरिना कैफ समवेत तो बॉलीवू़डमध्ये येण्यास सज्ज झाला आहे. एप्रिलपासून विजयच्या या नव्या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार असली तरी अद्याप त्याच्या नव्या चित्रपटाचे नाव ठरलेलं नाही. श्रीराम राघवन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

सगळयांना या चित्रपटाचे नाव काय असणार याची उत्सुकता लागली आहे. सोशल मीडियावर विजयच्या चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. हा एक थ्रिलर मुव्ही असून तो 90 मिनिटांचा असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी असे सांगण्यात आले होते की विजयच्या या चित्रपटाचे शुटिंग हे पुण्यात होणार आहे. येत्या एप्रिल पासून ते सुरु होणार असल्याची शक्यता आहे.  पिंकविलानं दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे नाव मेरी ख्रिसमस असे असणार आहे. कमी बजेटमध्ये तयार होणा-या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचे पुण्याशी भावनिक नाते आहे. या चित्रपटाची कथा पुण्याशी संबंधित आहे. जॉनी गद्दार, बदलापूर आणि अंधाधूनची कथाही पुण्यात घडताना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली होती.