esakal | अभिनेत्री तापसी पन्नूची गरजू विद्यार्थिनीला विशेष मदत...
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेत्री तापसी पन्नूची गरजू विद्यार्थिनीला विशेष मदत...

गरजू मुलीसाठी बातमी वाचून तापसीने त्वरित त्यांच्याशी संपर्क साधला आणि लगेचच त्या मुलीला स्मार्टफोन पाठवून मदतीचा हात दिला.

अभिनेत्री तापसी पन्नूची गरजू विद्यार्थिनीला विशेष मदत...

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे


मुंबई ः अभिनेत्री तापसी पन्नूने विविध भूमिका साकारून स्वतःला सिद्ध केले आहे. एक उत्तम अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते आणि तिने आपल्या कामामधून स्वत: ला सिद्ध केले आहे. ती एक उत्तम अभिनेत्री आहेच पण आता तिने जे काम केलंय त्यावरून ती एक जबाबदार नागरिक आणि माणूस म्हणून खूप चांगली आहे याचा प्रत्यय नक्कीच येतो.

गुरुदत्त यांचे जीवन रुपेरी पडद्यावर; लवकरच प्रदर्शित होणार बायोपिक...

अलीकडेच, कर्नाटकमधील एका मुलीने डॉक्टर होण्याचा निर्धार केला. परंतु परिस्थितीमुळे ती ऑनलाईन शिक्षण घेण्यास असमर्थ आहे. याबद्दल तापसीने ऑनलाइन लेख वाचला तेव्हा अभिनेत्री भावनिक झाली. सध्या बहुतेक प्रशिक्षण आणि शिक्षण कोरोना व्हायरसमुळे ऑनलाइन झाल्यामुळे स्मार्टफोनशिवाय नीट परीक्षेची तयारी करणे हा तिच्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. या मुलीला शिक्षण घेण्यासाठी मदत करण्यासाठी वडिलांनी स्मार्टफोन मिळविण्याकरिता मदत मागितली होती. ही बातमी वाचून तापसीने त्वरित त्यांच्याशी संपर्क साधला आणि लगेचच त्या मुलीला स्मार्टफोन पाठवून मदतीचा हात दिला.

पोलिसांना लागली टीप, अन् मक्याच्या कणसांखाली सापडला सव्वा कोटींचा गांजा; ट्रकचा चालक फरार

याबाबत बोलताना ही विद्यार्थिनी म्हणाली की, "मला तापसी मॅमनी पाठवलेला फोन मिळाला. त्यांनी माझ्यासाठी आयफोन पाठवला आहे आणि यावर माझा विश्वासच बसत नाहीये. मी याची कल्पना देखील करू शकत नाही!  मी खूप प्रयत्न करेन आणि नीट (मेडिकल प्रवेश परीक्षा) उत्तीर्ण करण्याचा प्रयत्न करीन."

--------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

loading image