दीपिका पदूकोण आणि हृतिक रोशन पडद्यावर एकत्र दिसण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 8 January 2021

दीपिकाने हृतिकच्या मेसेजला रिप्लाय दिला आहे. यासोबतंच ती असं काही म्हणाली आहे ज्यामुळे दोघांच्या आगामी सिनेमाबाबात अंदाज लावले जात आहेत. 

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदूकोणने ५ जानेवारी रोजी ३५ वा वाढदिवस सेलिब्रेट केला. तिच्या चाहत्यांनी आणि बॉलीवूडमधील सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या. दीपिकाला अनेक बॉलीवूड कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. तिला शुभेच्छा देणा-यांच्या लीस्टमध्ये अभिनेता हृतिक रोशनच्या नावाचा देखील समावेश होता. आता दीपिकाने हृतिकच्या मेसेजला रिप्लाय दिला आहे. यासोबतंच ती असं काही म्हणाली आहे ज्यामुळे दोघांच्या आगामी सिनेमाबाबात अंदाज लावले जात आहेत. 

हे ही वाचा: तैमुरसोबत नोरा फतेहीला करायचं आहे लग्न, करिना कपूरने अशी दिली रिऍक्शन  

'वॉर' सिनेमाचा अभिनेता हृतिक रोशनने 'पद्मावत' फेम अभिनेत्री दीपिका पदूकोणला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक प्रेमळ मेसेज शेअर केला होता. हृतिकने लिहिलं होतं की 'हॅप्पी बर्थडे माय डिअर दीपिका पदूकोण, झगमगत राहा आणि जगाला आश्चर्यचकित करत राहा जे तु नेहमी करतेस. खूप शुभेच्छा.'

दीपिकाला तसं तर अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र हृतिक रोशनने या पोस्टमध्ये सगळ्या शुभेच्छुकांचं लक्ष वेधून घेतलं आणि आता तर दीपिकाने यावर प्रतिक्रिया देत चाहत्यांचं मन जिंकलं आहे.दीपिकाने रिप्लाय करत लिहिलं आहे, 'धन्यवाद हृतिक रोशन. पुढच्या दोन दिवसात यापेक्षा मोठं सेलिब्रेशन येणार आहे.'

तिच्या असं लिहिण्याने चाहते आता आशा करत आहेत की दीपिका त्या दोघांच्या आगामी सिनेमाची घोषणा करण्याची हिंट दिली आहे. तर काही लोकांचं म्हणणं आहे हा उत्सव हृतिक रोशनच्या वाढदिवसासाठी आहे जो काही दिवसांतंच म्हणजे १० जानेवारी रोजी आहे. त्याचे चाहते यासाठी खूप उत्सुक आहेत आणि आत्तापासूनंच सेलिब्रेशनची उलटी मोजणी सुरु केली आहे.   

speculation of deepika padukone and hrithik roshan appearing together on the screen resumed  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: speculation of deepika padukone and hrithik roshan appearing together on the screen resumed