esakal | 'Miss You', श्रीदेवीच्या आठवणीने भावूक झाली जान्हवी कपूर
sakal

बोलून बातमी शोधा

Sridevi death anniversary janhavi kapoor share photo puja in chennai

13 ऑगस्ट 1963 साली श्री देवीचा जन्म झाला. तमिळनाडू येथील मिनामपट्टी या लहान गावात श्रीदेवीचे बालपण गेले.

'Miss You', श्रीदेवीच्या आठवणीने भावूक झाली जान्हवी कपूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बॅालिवूडमधील प्रसिद्ध आणि एवर ग्रीन अभिनेत्री श्रीदेवीचा आज स्मृतीदिन. श्रीदेवीचे खरे नाव श्री अम्मा यांगर अय्यपन असे आहे. 13 ऑगस्ट 1963 साली श्रीदेवीचा जन्म झाला. तमिळनाडू येथील मिनामपट्टी या लहान गावात श्रीदेवीचे बालपण गेले. तिच्या आईचे नाव राजेश्वरी असून त्या तेलगू अभिनेत्री होत्या. श्रीदेवीचे वडिल सिवाकासी या गावात वकील होते. श्रीदेवीला दोन सावत्र भाऊ आहेत.


अभिनय क्षेत्रातील श्रीदेवीच्या करियरची सुरूवात बाल कलाकार असताना झाली. त्यानंतर सोलहवां सावन, हिम्मतवाला, मवाली, तोहफा, नगीना, घर संसार, आखिरी रास्ता, कर्मा, मि. इंडिया या सुपरहिट चित्रपटांमधून श्रीदेवी प्रेक्षकांच्या भेटीस आली. चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते बोनी कपूर यांच्याशी १९९६ मध्ये तिने लग्न केले. असे म्हटले जात होते की मिस्टर इंडिया या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी या दोघांचे नाते जुळले होते. त्यानंतर त्यांना जाह्नवी कपूर व खूशी कपूर या दोन मुली झाल्या. 24 फेब्रुवारी 2018 ला दुबईला असताना श्रीदेवीचा मृत्यु झाला. आज श्रीदेवीच्या तिसऱ्या स्मृती दिना निमित्त तिची मुलगी जान्हवीने चेन्नईला पूजा ठेवली होती. यावेळी सर्वांनी श्रीदेवीला श्रध्दांजली वाहिली.

loading image