SS Rajamouli did not like Aamir Khan acting in Lal Singh Chadha
SS Rajamouli did not like Aamir Khan acting in Lal Singh Chadhaesakal

SS Rajamouli On Aamir Khan : 'खरं सांगू मला आमिरचा लाल सिंग चढ्ढा आवडलाच नाही, त्यात त्यानं....'

ऑस्कर विजेते दिग्दर्शक एस एस राजामौली यांची लाल सिंग चढ्ढा आणि आमिर खानवरील प्रतिक्रिया समोर आली आहे.
Published on

SS Rajamouli did not like Aamir Khan acting in Lal Singh Chadha: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या लाल सिंग चढ्ढा नावाच्या चित्रपटावरुन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आमिरला त्याच्या या चित्रपटानं खूपच मानसिक त्रास दिला. त्याच्यावर खूप टीकाही झाली होती. आमिरचा हा चित्रपट फ्लॉप झाला होता.

ऑस्कर विजेते दिग्दर्शक एस एस राजामौली यांची लाल सिंग चढ्ढा आणि आमिर खानवरील प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यात त्यांनी त्यांना आमिरचा लाल सिंग चढ्ढा पाहिल्यावर काय वाटले याविषयी सांगितले आहे. सोशल मीडियावर राजामौली यांची ती प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत तरतुदी जाणून घ्या

आमिरच्या चुलत भावानं जो धक्कादायक खुलासा केला आहे तो समोर आला आहे. त्यात तो म्हणतो, आमिरचा सेन्स ऑफ ह्युमर खूपच चांगला आहे. आमच्या नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा झाली आहे. मात्र मी जेव्हा राजामौली यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी मला सांगितले होते की, लाल सिंग चढ्ढा पाहिल्यावर मला आमिरचा अभिनय हा ओव्हर अॅक्टिंग वाटला होता. त्यामुळे की काय प्रेक्षकांना देखील त्याची ती गोष्ट जाणवली असेल.

SS Rajamouli did not like Aamir Khan acting in Lal Singh Chadha
OMG 2 Review: कांतीलाल आला 'त्या' विषयावर डोस देऊन गेला! भगवान शंकरही शॉक

मी आमिरचा भाऊ असलो म्हणून काय झाले पण त्याला खरं ते सांगितले होते. त्याला खरा रिव्हयू दिला होता. फिल्मचे लेखक अतूल कुलकर्णी यांनी चांगले काम केले होते. मात्र मला वाटते की,आमिरची अॅक्टिंग खूपच निराशाजनक होती. त्यानं जास्तच अभिनय केला आणि त्यामुळे तो चर्चेत आला. प्रेक्षकांनाही ते पाहताना जाणवले. मी टॉम हँक्सचा फॉरेस्ट गंप पाहिला होता. आणि मला त्याचे कामही आवडले होते. हे मी आमिरला सांगितले होते. असेही मन्सूरनं यावेळी सांगितले.

तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण आमीरचा जेव्हा लाल सिंग चढ्ढा फ्लॉप झाला तेव्हा त्यानं बॉलीवूडपासून ब्रेक घेतल्याचे दिसून आले. आमिरलाही प्रेक्षक आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात नाकारतील असे वाटले नव्हते. मुळातच एका गाजलेल्या हॉलीवूडपटाचा रिमेक त्यानं तयार केला होता. जो चित्रपट बऱ्याच जणांनी पाहिला असल्यानं त्याच्या हिंदी रिमेकविषयी म्हणावी इतकी चाहत्यांमध्ये उत्सूकता नव्हती.

SS Rajamouli did not like Aamir Khan acting in Lal Singh Chadha
Gadar 2 Review : तुम्ही दरवेळी पाकिस्तानात जायचं, तोडफोड करुन भारतात यायचं, प्रेक्षकांनी ते पाहायचं! म्हणजे आम्ही वेडे?

मुळातच आमिरनं बऱ्यापैकी हॉलीवूडच्या फॉरेस्ट गंपची कॉपी केली होती. त्यातच त्याच्या पूर्वीच्या काही मुलाखती सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्याचा परिणामही आमिरच्या चित्रपटांवर झाल्याचे दिसून आले. भलेही आमिरनं त्याबद्दल प्रेक्षकांची, नेटकऱ्यांची माफी मागितली असेल, पण त्याच्याविषयीची अपप्रचार काही केल्या थांबला नाही. त्यामुळे आमिरला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं.

आमिर हा काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका कार्यक्रमामध्ये दिसला होता. लाल सिंग चढ्ढानंतर त्यानं ब्रेक घेतल्याचे दिसून आले. लाल सिंग चढ्ढाच्या फ्लॉप होण्याचा आमिरवर मोठा परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर तो पुन्हा दमदारपणे पदार्पण करेल असेही बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com