'RRR'चं प्रदर्शन पुन्हा पुढे ढकललं; प्रेक्षकांना करावी लागणार आणखी प्रतीक्षा

गेल्या काही दिवसांपासून देशभरात या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू होतं.
RRR Trailor
RRR TrailorYoutube

'बाहुबली' या बिग बजेट आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या चित्रपटानंतर दिग्दर्शक एस.एस.राजामौली SS Rajamouli यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'RRR' हा चित्रपट येत्या ७ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र पुन्हा एकदा या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू होतं. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. मात्र त्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित ही एक भावनिक कथा आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांना एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचं समजतंय.

तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ज्युनियर एनटीआर कोमाराम भीम यांच्या भूमिकेत आहे तर रामचरण हा अल्लुरी सीताराम राजू यांची भूमिका साकारत आहे. ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्याव्यतिरिक्त चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण, श्रिया सरन, ऑलिव्हिया मॉरिस, रे स्टीव्हन्सन, अॅलिसन डूडी आणि समुथिराकनी यांच्या भूमिका आहेत.

RRR Trailor
RRR Trailer: राजामौलींचा मोठा प्रोजेक्ट; डोळ्यांचं पारणं फेडणारा ट्रेलर पहाच!

या चित्रपटाला एमएम किरवाणी यांनी संगीतबद्ध केलं आहे. RRRची निर्मिती DVV दानय्या यांनी त्यांच्या DVV एंटरटेन्मेंट या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत मोठ्या बजेटमध्ये केली आहे. या चित्रपटाचं बजेट ४५० कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. RRR हा २०२२ मधील सर्वांत मोठा चित्रपट ठरणार आहे. RRRचं जेव्हा चित्रिकरण सुरु होते तेव्हा त्याच्या चित्रिकरणाच्या एका दिवसाचा खर्च 75 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. बिग बजेट या चित्रपटामध्ये हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. द क्वींटला आरआरआरच्या टीमनं दिलेल्या मुलाखतीमध्ये ही गोष्ट सांगण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com