खलनायक सोनू सुद प्रत्यक्ष आयुष्यात हिरो

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ३१ मे पर्यंत लॉकडाउनचा चौथा टप्पा वाढवला आहे. पहिल्या दोन टप्प्यांत इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांना प्रवासाची बंदी घालण्यात आली होती. मात्र रोजगार तुटल्यामुळे या मजुरांना अनेक हालअपेष्टा सोसाव्या लागत होत्या.

मुंबई : आपण चित्रपट सृष्टीत अनेक भूमिका साकारणारे कलाकार पाहतो. त्यात मुख्य भूमिकेत असतात ते म्हणजे अभिनेता आणि खलनायक यांची जोडी. चित्रपटात जरी खलनायकाची भूमिका साकारायची असली तरी ख-या आयुष्यात हिरो असणारे कलाकारही आपल्याला पाहायला मिळतात. त्यातीलच एक बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपटात खलनायकाची भूमिका बजावण्यात प्रसिद्ध असलेले सोनू सुद.

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ३१ मे पर्यंत लॉकडाउनचा चौथा टप्पा वाढवला आहे. पहिल्या दोन टप्प्यांत इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांना प्रवासाची बंदी घालण्यात आली होती. मात्र रोजगार तुटल्यामुळे या मजुरांना अनेक हालअपेष्टा सोसाव्या लागत होत्या. अखेरीस केंद्र सरकारने या मजुरांना आपल्या घरी परतण्यासाठी प्रवासाची परवानगी दिली.याचसोबत मजुरांसाठी रेल्वे विभागातर्फे विशेष श्रमिक एक्स्प्रेस गाड्यांची सोयही केली. दरम्यान या काळात समाजातील अनेकं लोकं आपापल्यापरीने या कामगारांची मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.

बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपटात खलनायकाची भूमिका बजावण्यात प्रसिद्ध असलेल्या सोनू सुदने या काळात अनेक कामगारांना आपल्या घरी पोहचण्यासाठी बस गाड्यांची सोय केली.काही दिवसांपूर्वी सोनूने मुंबईत अडकलेल्या कर्नाटकातील कामगारांना घरी जाण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेत १० बस गाड्यांची सोय केली.त्याच्या याच कामाचं राज्याचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी कौतुक केलं आहे. पडद्यावर खलनायकाचं काम करणारा, प्रत्यक्ष आयुष्यात हिरोचं काम करत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

याआधीही सोनू सुदने करोनाविरुद्ध लढ्यात आपला सक्रीय सहभाग नोंदवला आहे.अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यापासून ते डॉक्टरांना पीपीई किट देण्यापर्यंत सोनूने आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण केली आहे.अजुनही तो घरी जाणाऱ्या कामगार व मजुरांना मदत करतो आहे. सोनू सुद‌ प्रत्यक्ष आयुष्यात खरा हिरो असलेला दिसून येत आहे . 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Cabinet Minister Jayant Patil Praises Bollywood Actor Sonu Sood For Helping Migrants