राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत "ऱ्हासपर्व' दुसरे 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 March 2019

राज्य नाट्य स्पर्धा

  • फोंडा येथील हंस संगीत नाट्य मंडळाचे "अव्याहत' नाटक प्रथम
  • परिवर्तन कला फौंडेशनचे "ऱ्हासपर्व' नाटक द्वितीय
  • नगर अर्बन बॅंक कला व क्रीडा मंडळाचे "द ग्रेट एक्‍स्चेंज' तृतिय

कोल्हापूर - सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे झालेल्या 58 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत येथील परिवर्तन कला फौंडेशनच्या "ऱ्हासपर्व' या नाटकाने चार वैयक्तिक बक्षीसांसह बाजी मारली. 15 फेब्रुवारी ते आठ मार्च या काळात सांगली व मिरज येथे स्पर्धेची अंतिम फेरी झाली. त्यात राज्यभरातील एकूण 39 प्रयोग सादर झाले होते. 

दरम्यान, फोंडा येथील हंस संगीत नाट्य मंडळाच्या "अव्याहत' नाटकाने पहिला तर अहमदनगरच्या नगर अर्बन बॅंक कला व क्रीडा मंडळाच्या "द ग्रेट एक्‍स्चेंज' नाटकाने तिसरा क्रमांक पटकावला. 
"ऱ्हासपर्व'चे दिग्दर्शक किरणसिंह चव्हाण यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे दुसरे तर सदानंद सुर्यवंशी यांना रंगभूषेसाठीचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. सत्यजीत साळोखे व स्नेहल बुरसे यांना अभिनयाची रौप्यपदके मिळाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Drama competition result