esakal | #HappyBirthdayJanhavi : ...त्यामुळे श्रीदेवीने मुलीचं नाव जान्हवी ठेवलं!

बोलून बातमी शोधा

Janhavi_Kapoor

'धडक' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर नेहमीच जान्हवीची तुलना श्रीदेवींशी केली जाते. श्रीदेवींचे चाहते जान्हवीमध्ये श्रीदेवींना शोधण्याचा प्रयत्न करतात.

#HappyBirthdayJanhavi : ...त्यामुळे श्रीदेवीने मुलीचं नाव जान्हवी ठेवलं!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अभिनेत्री जान्हवी कपूरने दोन वर्षांपूर्वी 'धडक' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी आज तिचा 23 वा वाढदिवस साजरा करत आहे. परंतु वाढदिवसाच्या दिवशी ती तिच्या 'रूही अफ्जा' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यानंतर ती तिचा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा करणार आहे.

जान्हवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच एक सेलिब्रेटी आणि अभिनेत्री होती. 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करत तिने आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं. पहिल्याच चित्रपटानंतर तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. एक स्टार किड म्हणून ती नेहमीच चर्चेच असते. जान्हवी नेहमीच तिच्या सौंदर्यांने कोणत्याही कार्यक्रमात भाव खाऊन जाते. 

तिच्याबद्दल जाणून घेण्याची बऱ्याच चाहत्यांची इच्छा असते. चाहत्यांना कदाचित ही गोष्टी माहिती नसावी. पण जान्हवीच्या नावामागेही एक कथा दडलेली आहे. 1998 साली श्रीदेवी 'जुदाई' चित्रपटासाठी काम करत होत्या. मात्र या चित्रपटात अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने साकारलेली जान्हवीची भूमिका त्यांच्या मनात बसली होती. त्यावेळी त्यांनी ठरवलं होतं की मला मुलगी झाली की मी तिचं नाव जान्हवी हेच ठेवणार. आणि खऱ्या आयुष्यातही त्यांना सुंदर जान्हवी मिळाली. 

जान्हवीचं आई श्रीदेवीसोबत मैत्रीचं नातं होतं. माय-लेकीपेक्षा या दोघींची एकमेकींबरोबर मैत्रिणी सारखी वागणं असायचं. जान्हवी नेहमीच श्रीदेवी यांच्यासोबतच असायची. जान्हवीच्या बॉलिवूड पदार्पणसाठी श्रीदेवी खूप उत्सुक होत्या. मात्र लेकीला रूपेरी पडद्यावर पाहण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. यावेळी जान्हवी खूप मोठा धक्का लागला होता. श्रीदेवींकडून जान्हवीला अभिनय क्षेत्रातल्या बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. श्रीदेवींनी जान्हवीच्या पदार्पणची जबाबदारी दिग्दर्शक-निर्माते करण जौहर यांच्यावर सोपवली होती. आणि धर्मा प्रोडक्‍शनच्या 'धडक' चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 

'धडक' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर नेहमीच जान्हवीची तुलना श्रीदेवींशी केली जाते. श्रीदेवींचे चाहते जान्हवीमध्ये श्रीदेवींना शोधण्याचा प्रयत्न करतात. 'धडक' चित्रपट जान्हवीकडे अनेक हिंदी चित्रपट लाईनअप आहेत.