Street Dancer 3D : डान्सर श्रद्धा आणि वरुणचा पोस्टरमधून लुक आला समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Street Dancer 3D movie poster release

Street Dancer 3D : डान्स आणि त्याचं पॅशन यावर आधारीत असलेल्या चित्रपटामध्ये श्रद्धा आणि वरुण या जोडीला लोकांनी पसंत केलं. ही जोडी पुन्हा एकदा नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास तयार झाली आहे. 

Street Dancer 3D : डान्सर श्रद्धा आणि वरुणचा पोस्टरमधून लुक आला समोर

मुंबई : श्रद्धा कपूर आणि वरुण धवन यांनी हे डान्स पार्टनर आहेत. आतापासून नाही तर लहानपणापासूनच या दोघांनी अनेकदा एकत्र डान्स केला आहे. या डान्स पार्टनर्सनी 'ABCD 2' मध्ये एकत्र काम आणि डान्स केला. डान्स आणि त्याचं पॅशन यावर आधारीत असलेल्या चित्रपटामध्ये श्रद्धा आणि वरुण या जोडीला लोकांनी पसंत केलं. ही जोडी पुन्हा एकदा नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास तयार झाली आहे. 

श्रद्धा कपूर आणि वरुण धवन यांचा आगामी सिनेमा 'Street Dancer 3D' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील कलाकारांच्या लुकचे पोस्टर नुकतेच रिलिज झाले असून सोशल मीडियवर सध्या त्याचीच चर्चा पाहायला मिळतेय. 'ABCD' या चित्रपटाचा हा सिक्वेल असणार आहे. वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांनी इन्स्टाग्रामवर हे पोस्टर शेअर केले आहेत. 

चित्रपट हा संपूर्णपणे डान्सवर आधारीत आहे. त्यामुळे डान्ससाठी कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे. शुटींगदरम्यान डान्सच्या प्रॅक्टीसचे व्हिडीओ श्रद्धा आणि वरुनने शेअर केले आहेत. पोस्टरमध्ये वरुण आणि श्रद्धाचा लुक जबरदस्त आहे. 'ABCD' आणि 'ABCD 2' हे दोन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर हिट ठरले. त्यानंतर पोस्टर पाहिल्यावर 'स्ट्रीट डान्सर 3D' हा चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. 

या चित्रपटाची कथा काय असणार आहे हे स्पष्ट झालेले नाही. चित्रपटाचा ट्रेलर 18 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर, सिनेमा पुढील वर्षी 24 जानेवारीला रिलिज होणार आहे.  या चित्रपटामध्ये नोरा फतेह आणि रेमो डिसुजा देखील झळकणार आहेत.

श्रद्धा कपूरच्याआधी या चित्रपटामध्ये रेमो डिसुजा यांना कॅटरीना कैफ हिला कास्ट करायचे होते. पण, त्यावेळी कॅटरीना 'भारत' चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त होती. 
 

Web Title: Street Dancer 3d Movie Poster Release

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top