सॅक्रेड गेम्समधला 'बंटी' चक्क दोन वेळा झाला होता नापास!

Struggle story of Jatin Sarana plays bunty character in Sacred Games
Struggle story of Jatin Sarana plays bunty character in Sacred Games

नेटफ्लिक्सची पहिली ओरिजनल सीरिज ‘सॅक्रेड गेम्स’ ही घरा-घरांत पोचली आहे. त्याच्या दुसऱ्या सिजच्या ट्रेलरने सीरीजची उत्सुकता अजुनच वाढवली आहे. ही सीरीज त्याच्या वेगळ्या कथानकासह, त्यातील अनेक नवे चेहरे आणि त्यांच्या उत्कृष्ट दर्जाच्या अभिनयासाठी देखील चर्चेत आली.

त्यातील एक नाव म्हणजे बंटी! 'बंटी' एक अस नाव जे आपलं आहे, जे आपल्या आजुबाजुच आहे अस प्रत्येकालाच वाटत. आणि ती व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता 'जतिन सरना' हा ही प्रेक्षकांना तितकाच आपलासा वाटतो. सेक्रेड गेम्स मध्ये एक बिंधास्त, रागीट व्यक्तीमत्व साकारणाऱ्या जतिनने त्याला ही भूमिका कशी मिळाली, या क्षेत्रातला त्याचा प्रवास या बद्दल सांगितले.

जतिन हा दिल्लीचा असून तो एक मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला आहे. त्याच्या घरची आर्थिक स्थिती हालातीची होती. कॉलेजचे शिक्षण पूर्ण होताच जतीनने अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. वडीलांनी हातात दिलेले 5000 रूपये घेऊन तो मुंबईमध्ये आला. पण जतिन हा एक प्रशिक्षित अभिनेता नसल्याने त्याला प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले.

अ‍ॅक्टिंगमध्ये जर करियर करायच असेल तरआपल्याया ट्रेनिंग घ्यावी लागेल असे त्याला वाटले आणि अखेर त्याने श्रीराम सेंटरमध्ये ट्रेनिंग. तिथे त्याने त्याच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती.

आपली स्वप्न पुर्ण करण्यासाठी मुंबईला आलेल्या जतिनचे नशीब अचानक चमकले जेव्हा त्याला ‘सेक्रेड गेम्स’ ही सीरिज त्याला मिळाली. त्याच अॅडिशन अगदी सिरळीतपणे पार पडता, अनुराग कश्यपने स्वत: त्याला मेसेज करून त्याला बंटी या व्यक्तीरेखेबद्दल सांगितल. 

जतिनच्या मते, त्याने बंटी बद्दल ना कधी ऐकल होते ना तसा त्याने तसा व्यक्ती पाहिलाही नाही हे. त्याने बंटी हा खतरनाक आहे असेही एकदा म्हटले आहे. बंटीने जतिनच्या करियरला कलाटणी दिली यात काही वादच नाही.

नववी आणि अकरावीमध्ये नापास झालेल्या जतिनने आपली बारावी कशीबशी पूर्ण केली. जेव्हा दिल्लीत एक पार्टटाईम नोकरी करून त्याने एनएसडीत प्रवेश मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. पण तिथेही जतीनला अपयश आले. पण अपयशांना न जुमानता नापास होणाऱ्या जतिनने  'सॅक्रेड परिक्षेत उत्कृष्ट गेम खेळून गेला'.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com