Subodh Bhave: कट्यार.. नंतर सुबोधची पुन्हा सांगीतिक मेजवानी.. केली मोठी घोषणा!

'कट्यार काळजात घुसली’ला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केली घोषणा..
subodh bhave announce his next musical movie after katyar kaljat ghusali in next year
subodh bhave announce his next musical movie after katyar kaljat ghusali in next yearsakal
Updated on

subodh bhave: २०१५ मध्ये मराठी चित्रपटात सृष्टीत 'कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाने एक वेगळं जग प्रेक्षकांसमोर आणलं. अत्यंत दमदार सादरीकरण आणि दर्जेदार संगीत यामुळे हा चित्रपट मैलाचा दगड ठरला. सर्वाधिक पुरस्कार पटकावणाऱ्या या चित्रपटाचे नाव आजही आवर्जून घेतले जाते. काल १२ नोव्हेंबर रोजी चित्रपटाला 7 वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने एक पोस्ट शेयर करत सुबोध भावेने एक मोठी घोषणा केली.

(subodh bhave announce his next musical movie after katyar kaljat ghusali in next year)

subodh bhave announce his next musical movie after katyar kaljat ghusali in next year
Bigg Boss Marathi 4: मन आन पोट दोन्हीबी भरलं! किरण मानेची मांजरेकरांसाठी खास पोस्ट

हा चित्रपट १९६७ मध्ये मराठी रंगभूमीवर ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकावर बेतला होता. पुरुषोत्तम दारव्हेकर मास्तर यांच्या लेखणीtoच तून आलेलं ही नाटक अजरामर झालं. तसाच दर्जा चित्रपटानेही राखला. या चित्रपटात सुबोध केवळ प्रमुख भूमिकेत नव्हता तर त्याने चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. त्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट अत्यंत महत्वाचा मानला जातो. या चित्रपटाला नुकतीच सात वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने सुबोधने एक पोस्ट लिहिली आहे.

subodh bhave announce his next musical movie after katyar kaljat ghusali in next year
Shilpa Tulaskar: काही निर्माते चहा-कॉफीचेही हिशोब ठेवतात.. शिल्पा तुळसकरने केली पोलखोल

''कट्यार काळजात घुसली.. १२ नोव्हेंबर २०१५.. एका संगीतमय आनंददायी प्रवासाचे सातवे वर्ष. संगीत माणसं जोडतं आणि आनंद निर्माण करतं! अजून एक आनंददायी संगीतमय प्रवास पुढील वर्षी. तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद.. '' अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे . त्यामुळे लवकरच सुबोध अजून एक सांगीतिक चित्रपट आपल्या भेटीला आणणार आहे याची घोषणा त्याने या निमित्ताने केली.

सुबोधच्या या पोस्ट नंतर या चित्रपट कोणता असेल, त्यात कोणते अभिनेते असतील, हा कट्यार.. चाच दूसरा भाग असेल का याची उत्कंठा चाहत्यांना लागली आहे. 'कट्यार' मध्ये सुबोध सोबत शंकर महादेवन, सचिन पिळगावकर, अमृता खानविलकर आणि मृण्मयी देशपांडे असे अनेक दमदार कलाकार होते. शिवाय या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले. त्यामुळे नवा सांगीतिक चित्रपट कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com