Subodh Bhave: हातात अगरबत्ती आणि तोंडात वेफर? सुबोध भावेच्या लुकची भलतीच चर्चा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

subodh bhave shared post on motion poster teaser marathi movie film vaalvi

Subodh Bhave: हातात अगरबत्ती आणि तोंडात वेफर? सुबोध भावेच्या लुकची भलतीच चर्चा..

Subodh Bhave: मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणजेच सुबोध भावे (subodh bhave). सुबोध वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका नेहमी साकारत असतो आणि त्यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकताच सुबोध 'हर हर महादेव' या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाजारांच्या भूमिकेत दिसला होता. लवकरच तो 'वाळवी' चित्रपटातून एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच त्याने या चित्रपटाचा टीझर शेयर केला आहे.

(subodh bhave shared post on motion poster teaser marathi movie film vaalvi)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: स्पर्धकांच्या भावनांचा बांध फुटला.. घरच्यांना पाहून सगळेच..

सुबोधने काही दिवसांपूर्वी एक विडिओ शेयर केला होता. ज्यामध्ये तो 'वाळवी' चित्रपट करत असल्याचे जाहीर झाले. दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी या व्हिडिओ प्रमोट केला होता. आता याच चित्रपटाचा एक छोटासा टीझर सुबोधने शेयर केला आहे.

हेही वाचा: Govinda Birthday: एखाद्याचा जलवा काय असतो हे गोविंदाला विचारा.. पठ्ठ्याने 36 तासात 14 सिनेमे साईन केले होते..

या व्हिडिओमध्ये सुबोध हा एका हातात अगरबत्ती आणि दुसऱ्या हातात वेफर धरुन उभा आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे की, ''हातात अगरबत्ती आणि वेफर... सुबोध भावे नक्की करतोय तरी काय? गुढ उलगडेल थेट नव्या वर्षात.... 'वाळवी' 13 जानेवारी 2023  पासून सर्वत्र प्रदर्शित...' अशी पोस्ट त्याने केली आहे.

झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी लवकरच 'वाळवी' चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'दिसतं तसं नसतं' अशी टॅगलाईन असलेल्या 'वाळवी' या चित्रपटाचे एक भन्नाट टीझर सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. येत्या 13 जानेवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. स्वप्नील जोशी, अनिता दाते, सुबोध भावे, शिवानी सुर्वे अनई सुबोध अशी दमदार कास्ट आहे. ही 'वाळवी' नेमकी कशाला लागली आहे, ती कोण आहे.. हे अद्याप उलगडलेले नाही.

टॅग्स :Subodh Bhave