'नकटी'सोबत लग्न करायला सुबोध होणार तयार

टीम ई सकाळ
बुधवार, 14 जून 2017

लग्नाचा सीझन आला की लगीनघाई जोरात सुरू होते. पण छोट्या पडद्यावर मात्र सतत लगीनघाई सुरू असते. काऱण नकटीचं लग्न कुठे ठरत नसल्यामुळे तिच्या घरचे सतत मुलगा पहात असतात. झी मराठीवर दिसणार्या नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेत आता सुबोध भावे हजेरी लावणार आहे. 

मुंबई : लग्नाचा सीझन आला की लगीनघाई जोरात सुरू होते. पण छोट्या पडद्यावर मात्र सतत लगीनघाई सुरू असते. काऱण नकटीचं लग्न कुठे ठरत नसल्यामुळे तिच्या घरचे सतत मुलगा पहात असतात. झी मराठीवर दिसणार्या नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेत आता सुबोध भावे हजेरी लावणार आहे. 

आजवर या मालिकेत अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, ललित प्रभाकर अशा अनेकांनी या मालिके हजेरी लावली. पण कुणालाही नकटीशी लग्न करायचा मुहुर्त सापडेना. आता सुबोध भावे आपली इनिंग खेळणार आहे. सुबोधने सोशल मिडीयावर गेटअपसह फोटो टाकून ही बातमी जाहीर केली. मी लवकरच या मालिकेत येत असून पांढरा सदरा आणि जॅकेट घालून सुबोध या मालिकेत अवतरणार आहे. या आठवड्यात तो या मालिकेत दिसेल. 

Web Title: Subodh in nakatichya lagnala eskal news