किंग खानची लेक पुन्हा एकदा ट्रोलरच्या निशाण्यावर!

वृत्तसंस्था
Saturday, 7 September 2019

सुहानाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमधल्या तिच्या कपड्यांवरुन नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलं आहे.

मुंबई : किंगखानची लेक सुहाना खान बॉलिवूडच्या फेमस स्टारकिडपैकी एक आहे. बॉलिवूडमध्ये तिने अद्याप पदार्पण केलं नसलं तरी इंटरनेटवर ती चर्चेत असते. तिने नवा फोटो अपलोड केला की तो अनेकदा व्हायरल होतोच. आता ही असचं काहीसं घडलं आहे. सुहानाने नुकताच तिच्या इंनस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमधल्या तिच्या कपड्यांवरुन नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

When u smile I smile coz I love your smile baby #Suhanakhan

A post shared by suhana khan ( READ BIO PLS) (@suhanakha2) on

सुहानाचा हा फोटो तिच्या नव्या कॉलेजमधला असून त्यात ती सुंदर स्माईल करताना दिसत आहे. बेंचवर बसलेल्या सुहानाचा फोटो तिच्या काही मैत्रीणींनी काढला आहे. मात्र, फोटोमधल्या तिने दिलेल्या पोजमुळे आणि कपडयांमुळे तिला अनेकांनी कमेंटमध्येच सल्ले दिले आहेत.

"तू शाहरुख खानची मुलगी आहेस याचं भान राख" अशा तिखट प्रतिक्रिया काहींनी दिल्या आहेत.

एका युजरने कमेंट करताना लिहिलं आहे की, "इतकं शो ऑफ करण्याची गरज नाही. तू नॉर्मल कपड्यांमध्येही तितकीच सुंदर दिसशील."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suhana Khan gets trolled for her exposing picture on Instagram