चित्रपट कसा बघावा? 

movie
movie

करमणुकीच्या संकल्पनेपलीकडे जाऊन चित्रपटाचा आस्वाद सर्वसामान्य रसिकांना घेता यावा यासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया यांच्यातर्फे दरवर्षी चित्रपट रसास्वाद शिबिर आयोजित केले जाते. या वर्षीचे पंधरावे शिबिर 1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ऑनलाइन घेतले जाणार असल्यामुळे पुण्याबाहेरील रसिकांनाही या कोर्सचा लाभ घेता येणार आहे. 

"सच क्‍या होता है? हर एक का अपना अपना व्हर्जन होता है' जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटामध्ये नसरुद्दीन शाहच्या तोंडी हे वाक्‍य फरहान अख्तर या संवाद लेखकाने दिग्दर्शिका झोया अख्तरसाठी आहे. हे पहिल्यांदा कोणी सांगितले? 1950मध्ये "रशोमान' या चित्रपटाद्वारे अकीरो कुरोसावा या महान दिग्दर्शकाने. कुरोसावा यांनी शिनोबू हिशमोटो याच्या साहाय्याने चित्रपटाची पटकथा लिहिली. एकच प्रसंग घडल्यानंतर त्याचा भाग असणारे आणि "बघे' एकच प्रसंग वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. हे नेहमीच घडत असते. कोणीतरी वेगळा मसाला लावून सांगतो/सांगते, तर कोणी सहेतुकपणे त्याच घटनेला वेगळ्याच वाटेवर घेऊन जातो/जाते. रशोमान इफेक्‍ट ही संकल्पना तेव्हापासून रूढ झाली. हा आहे एका चित्रपटाचा परिणाम आणि त्याचा करता करविता आहे अकीरो कुरोसावा. 

आरुषी तलवार हत्या प्रकरणामध्ये हे झाले, शिवाय त्याला वृत्तपत्रात प्रसिद्धी मिळाल्यामुळे एकाच घटनेचे वेगवेगळे पैलू लोकांना समजले. "तलवार' या चित्रपटात या एका घटनेचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून इतके उत्तम वर्णन केले आहे की, हा चित्रपट प्रत्येक दृष्टिकोनातून बघण्यासाठी तितक्‍या वेळा बघितला तरच वेगळेच पैलू समजतात. अर्थात हे कौशल्य सत्यघटना तितक्‍याच कौशल्याने दिग्दर्शित करणाऱ्या मेघना गुलजार आणि विशाल भारद्वाज यांचे. "नो वन किल्ड जेसिका'मध्येही एका घटनेचे विविध पैलू समजतात. परंतु रशोमान इफेक्‍टने दाखवलेले नाही. The usual suspects चित्रपट यासाठी पुन्हा एकदा बघावा. Vantage Point या चित्रपटात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या खुनाचा प्रयत्न केला जातो तो प्रसंग वेगवेगळ्या दृष्टिकोनातून दाखवला आहे. हा आवर्जून बघण्यासारखा थ्रिलर आहे, ज्याचे मूळ "रशोमान'मध्ये सापडते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चित्रपटाकडे मनोरंजनाचे साधन अशा स्वरूपात बघतो. "दोन घटका करमणूक' हे इतक्‍या वेळेला ऐकलेले असते की चित्रपट कलेचा सर्वांगाने विचार करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. एखादा चित्रपट आपल्याला का आवडला, तसे नसल्यास का आवडला नाही हे नेमके सांगणे कठीण जाते. चित्रपट कसा बनतो, चित्रपटाचे प्रकार कोणते असतात, चित्रपटाची तांत्रिक अंगे कोणती, चित्रपटामध्ये दिसणाऱ्या दृश्‍याचा दिग्दर्शक कसा विचार करतो आणि आपण त्याचा अर्थ कसा लावणे अपेक्षित असते, साहित्यावरून चित्रपट तयार करताना त्यामध्ये काय बदल होतात, चित्रपटामध्ये ध्वनी आणि संगीताचा अंतर्भाव कसा केला जातो, चित्रपट समजून बघण्यासाठी तो काळ, जे दिसते तेथील भौगोलिक, राजकीय परिस्थिती याचा विचार कसा आणि का केला जातो, चित्रपट हे टीमवर्क का समजले जाते अशा अनेक प्रश्‍नांना उत्तरे मिळाल्यानंतर चित्रपटाची भाषा समजायला लागते. कथेची पटकथा कशी लिहिली जाते आणि त्याचे दृश्‍य स्वरूप दिग्दर्शक कॅमेरामनच्या मदतीने आपल्यासमोर कसे उभे करतो याची माहिती घेणे एखादा चित्रपट बघण्याइतकेच उत्कंठावर्धक असते. 

चित्रपटाचा आस्वाद सर्वसामान्य रसिकांना घेता यावा यासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया यांच्यातर्फे दरवर्षी चित्रपट रसास्वाद शिबिर आयोजित केले जाते. या वर्षीचे पंधरावे शिबिर 1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ऑनलाइन घेतले जाणार असल्यामुळे पुण्याबाहेरील रसिकांनाही त्याचा लाभ घेता येणार आहे. डॉ मोहन आगाशे, समर नखाते, दीपक देवधर, सुहास किर्लोस्कर, अभिजित देशपांडे, अनुपम बर्वे, उमेश कुलकर्णी, श्‍यामला वनारसे, गणेश मतकरी, उज्वल निगुडकर, अभिजित रणदिवे, राहुल रानडे, सुधीर नांदगावकर, प्रकाश मगदूम असे अनेक तज्ज्ञ विश्‍लेषक जागतिक सिनेमाचे रसग्रहण मराठीमध्ये करताना दृक श्राव्य स्वरूपात व्याख्यान देणार आहेत. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिबिरामध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुकांनी सतीश जकातदार (982295882) आणि सुहास किर्लोस्कर (9422514910) यांच्याशी संपर्क साधावा. सत्यजित राय यांच्या जन्म शताब्दीच्या वर्षी त्यांच्या चित्रपटाबरोबर जागतिक चित्रपट आणि भारतीय भाषांमधील जुने-नवे, दर्जेदार आणि रसिकप्रिय चित्रपट मराठी भाषेमधून विविध अंगाने समजून घेणे ही रसिकांसाठी पर्वणीच ठरेल यात शंका नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com