Sulochana Chavan: पुणेकरांनो.. विसरू नका.. तुमच्यासाठी सुलोचना बाईंनी स्वतःचे दागिने विकले होते..

गाण्यातच नाही तर सामाजिक कामातही सुलोचना चव्हाण यांच्या हात कुणी धरू शकत नाही.
Sulochana Chavan passes away she sold her gold jewellery for helps panshet dam disaster
Sulochana Chavan passes away she sold her gold jewellery for helps panshet dam disaster sakal

sulochana chavhan: साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचे आज शनिवारी 10 डिसेंबर रोजी निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या दमदार आवाजाने सुलोचना बाईंनी रसिकांची माने तृप्त केली. शेकडो गाणी आज त्यांच्या आवाजाने अजरामर झाली आहेत. पण गायनाप्रमाणेच सामाजिक कामातही सुलोचना चव्हाण यांचा हात कुणीही धरू शकत नव्हतं. एकेकाळी दागिने विकून त्यांनी पुणेकरांची मदत केली आहे.

(Sulochana Chavan passes away she sold her gold jewellery for helps panshet dam disaster)

महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांनी मराठीसह हिंदी, गुजराती, भोजपुरी, तमीळ, पंजाबी आदी भाषांमध्येही पार्श्वगायन केले आहे. ज्यावेळी लावणीला फारशी प्रतिष्ठा नव्हती, तेव्हाही त्या अत्यंत सन्मानाने लावणी गात होत्या आणि लावणीला प्रतिष्ठा मिळवून देत होत्या. त्यांच्यासारखा आवाज आता पुन्हा होणे नाही. त्यांनी संगीत क्षेत्रात दिलेले योगदान सर्वांना ठाऊक आहेच पण सामाजिक कामातही त्या तिकत्याच हिरीरीने पुढे होत्या.

त्यांना समजाविषयी प्रचंड आस्था होती. सामाजिक बांधीलकीला कायम केंद्रस्थानी ठेवण्याच्या त्यांच्या स्वभावाने त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालये, संकटग्रस्त आदींसाठी मदतीसाठी अनेक कार्यक्रम केले. भरभरून आर्थिक मदत केली. पण एक वेळ अशी आली की लोकांच्या मदतीसाठी त्यांनी स्वतःचे दागिनेही मोडले.

१९६१ मध्ये पुण्यात पानशेत धरण फुटले हाहाकार झाला. यावेळी पुण्यावर मोठे संकट ओढवले होते. लोकांच्या जीविताचा, मूलभूत गरजांचा प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी पुण्यातील संकटग्रस्तांना मदत व्हावी म्हणून साठी सुलोचना बाईंनी गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमातून मदतनिधी जमा झाला पण तो मदतीसाठी पुरेसा नव्हता. शेवटी त्यांनी ती मदत अपुरी पडल्याने त्यांनी स्वत:चे दागिने विकून मदत पूर्ण केली. अशा मोठ्या मनाच्या आणि सामाजिक बांधिलकी राखणाऱ्या सुलोचना चव्हाण थोर गायिका होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com