
Sulochana Latkar Passed Away : मराठी - हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं अमीट छाप उमटविणाऱ्या अभिनेत्री सुलोचना दीदींच्या निधनानं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दीदींच्या जाण्याचे कळतात मराठी विश्वातील अनेक सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना दीदींच्या आठवणींना उजाळा देताना रडू आवरले नाही. Sulochana Latkar Passed Away age 94 marathi hindi movie Actress
तब्बल चारशे हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या दीदींचे जाणे हे मराठी विश्वासाठी धक्कादायक आहे. गेल्या काही दिवसांपासून श्वसनाच्या आजारानं त्रस्त असणाऱ्या दीदींना मुंबईतील दादरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मराठी सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर त्यांना आदरांजली वाहण्यास सुरुवात केली आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, उषा नाडकर्णी आणि प्रिया बेर्डे यांनी सुलोचना दीदींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना यावेळी दीदींच्या आठवणींना उजाळा देताना शोक अनावर झाला होता. त्या म्हणाल्या, सुलोचना दीदी प्रत्येक भूमिका जगल्या, बाईंचे बोलणे गोड, दिसणं गोड, पण त्यांचे जाणे खूपच वाईट आहे. त्यांच्या जाण्याची बातमी खूप धक्का देणारी आहे. माझी त्यांची भेट खूप दिवस झाली नाही. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. माझ्याकडून त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली. गोड बाई गेल्या. चित्रपटसृष्टी पोरकी झाली.
सुलोचना दीदींच्या जाण्यानं मराठी चित्रपट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. दीदींच्या जाण्याचे वृत्त कळताच मराठी, हिंदी चित्रपट विश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रेटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दीदी या काही दिवसांपासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
यापूर्वी मार्च मध्ये जेव्हा सुलोचनादीदी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुलोचनादीदींवरील उपचारांचा सर्व खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.