esakal | सुमेध अन् मल्लिकाची कानपूरमध्ये रंगली रासलीला
sakal

बोलून बातमी शोधा

radha-krishn.jpg

कानपूरमधील बिठूर येथील इस्कॉन मंदिर हे राधा कृष्णाचे सर्वांत मोठे मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात जन्माष्टमीचा मोठा सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदा स्टार भारत वाहिनीवरील राधाकृष्ण मालिकेतील कलाकार सुमेध मुदगलकर (कृष्ण) आणि मल्लिका सिंह (राधा) यांनी कानपूरवासीयांसह जन्माष्टमीचा सोहळा साजरा केला. ​

सुमेध अन् मल्लिकाची कानपूरमध्ये रंगली रासलीला

sakal_logo
By
गायत्री तांदळे

कानपूर : कानपूरमधील बिठूर येथील इस्कॉन मंदिर हे राधा कृष्णाचे सर्वांत मोठे मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात जन्माष्टमीचा मोठा सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदा स्टार भारत वाहिनीवरील राधाकृष्ण मालिकेतील कलाकार सुमेध मुदगलकर (कृष्ण) आणि मल्लिका सिंह (राधा) यांनी कानपूरवासीयांसह जन्माष्टमीचा सोहळा साजरा केला.

हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की, अशा जयघोषात कानपूरमधील इस्कॉन मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. यावेळी सुमेध आणि मल्लिकाने रासलीला सादर केली

>

या जन्माष्टमीच्या उत्सवात विविध राज्यातील नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान, यावेळी उपस्थित नागरिकांचे मालिके वरील प्रेम पाहून कलाकार भारावले. 
कानपूरमधील बिठूर येथील इस्कॉन मंदिर हे राधा कृष्णाचे सर्वांत मोठे मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात जन्माष्टमीचा मोठा सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदा राधाकृष्ण मालिकेतील कलाकारांनी या सोहळ्यात सहभागी होऊन या सोहळ्याचा आनंद घेतला. यावेळी सुमेध मुदगलकरने व मल्लिका सिंहने बालपणीच्या जन्माष्टमीच्या आठवणी शेअर केल्या.

सुमेध म्हणाला, "मी लहानपणापासून दहीहंडी पाहिली आहे. पण स्वतः हंडी कधी फोडली नाही परंतु यंदा मालिकेच्या निमित्ताने हा अनुभव घेता आला याचा फार आनंद होतोय. मालिकेत कृष्णाची भूमिका निभावताना त्यांच्या विचारधारा अनुभवतोय. ही भूमिका माझ्यासाठी महत्त्वाची आहे.' 
मल्लिका म्हणाली, "कानपूरमध्ये प्रत्यक्ष जन्माष्टमीच्या उत्सवात सहभागी झाल्याने प्रेक्षकांचे भरभरून प्रेम अनुभवायला मिळाले. मालिकेमुळे राधाची भूमिका साकारता आली याचा मला खूप आनंद आहे.' 

loading image
go to top