sumi trailer: पोरीचं लगीन तर सगळेच करतात, पण.. 'सुमी' चित्रपटाचा ट्रेलर पाहाच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sumi marathi movie trailer out planet marathi cast release date

sumi trailer: पोरीचं लगीन तर सगळेच करतात, पण.. 'सुमी' चित्रपटाचा ट्रेलर पाहाच!

डोळ्यांत अनेक स्वप्नं असणाऱ्या हसऱ्या 'सुमी'चे पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर झळकले. कोण आहे ही 'सुमी' याची उत्सुकता लागलेली असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बालदिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'सुमी' प्रत्येकाने पाहावा असाच आहे. 'सुमी' जिची भरपूर शिक्षण घेऊन ऑफिसर बनण्याची इच्छा आहे. तिच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा प्रवास यात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: तू तिच्या मिठीत पडली होतीस.. समृद्धी-अपूर्वामध्ये मोठा गैरसमज

शिक्षणाची प्रचंड ओढ असणाऱ्या 'सुमी'ची भूमिका आकांक्षा पिंगळे हिने साकारली असून याव्यतिरिक्त या चित्रपटात दिवेश इंदुलकर, स्मिता तांबे, नितीन भजन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. अमोल वसंत गोळे दिग्दर्शित या चित्रपटाला रोहन -रोहन यांनी संगीत दिले आहे.

ही कहाणी फक्त 'सुमी'ची नसून तिच्या आईवडिलांचीही आहे. 'सुमी'ची शिक्षणाची ओढ पाहता, तिचे आईवडील यासाठी तिला साथ देताना दिसत आहेत. शिक्षण घेण्याचा तिचा अट्टाहास आणि त्यासाठी सुमी आणि तिच्या पालकांचा संघर्ष यात दिसतोय. "पोरीचं लगीन तर सगळेच करतात, मी माझ्या पोरीला शिकवून पाहते" असं म्हणणारी 'सुमी' ची आई ही तेवढीच महत्वाकांक्षी व जिद्दी असल्याचे दिसून येतेय. आता 'सुमी'चे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होते की, तिला शिक्षणाला पूर्णविराम द्यावा लागतो, हे 'सुमी' पाहिल्यावरच कळेल.

हेही वाचा: Pathaan: मिनियन्स चाहत्यांची कलाकारी बघाच! शाहरुखच्या 'पठाण'चा मिनियन्स ट्रेलर..

समाजात स्त्रियांचे काम चूल आणि मुलं इतकेच नसून मुलीला शिकवणे किती महत्वाचे आहे, हा संदेश यात देण्यात आला असून 'सुमी'मध्ये कधी भांडणाऱ्या तर कधी एकमेकांना मदत करणाऱ्या आकांक्षा आणि दिवेशची निखळ मैत्री पाहायला मिळत आहे. सहज प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून जाणारा, सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला दाखवावा असा आहे. 'सुमी' लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला येणार आहे.

अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत, हर्षल कामत एंटरटेनमेंट व गोल्डन माउस प्रोडक्शन्स, ए. ए. क्रिएशन्स, फ्लायिंग गॉड फिल्म्स निर्मित 'सुमी' या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले आहे. हर्षल कामत, स्वाती एस. शर्मा, मिहिर कुमार शर्मा हे निर्माते असून अंजली आनंद पांचाळ, जयादित्य गिरी, जयंत येवले व सोनाली जयंत हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची मूळ कथा - पटकथा संजीव झा यांची आहे. तर या चित्रपटाला प्रसाद नामजोशी यांचे संवाद आणि गीत लाभले आहे.

टॅग्स :Marathi Movies