रविवारी लागणार 'राँग नंबर'!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

व्यावसायिक मराठी रंगभूमीवर चित्रपट आणि मालिकांत काम करणारे मराठी कलाकार जसे आवर्जून काम करतात तसे हिंदीमध्ये होताना दिसत नाही. हिंदी नाटक करणारे कलाकार एकदा का हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये अडकले की मग पुन्हा त्यांचं नाटक या माध्यमाकडे लक्ष वळतच असं नाही. अर्थात याला अपवाद असू शकतातच. जसे राकेश बेदी.

ते गेली अनेक वर्षे नाटकात काम करत आहेत. ‘ये जो है जिंदगी ही मालिका’ आणि ‘चष्मेबद्दूर’ या मालिका-चित्रपटातली त्यांची कामगिरी विसरू म्हटलं तरी विसरता येत नाही. त्यांनी यापूर्वीही अनेक नाटकांत काम केल होतंच. तेंडुलकरांच्या ‘मसाज’चं हिंदी एकपात्री रूपांतरही त्यांनी सादर केलं होतं. नाटक हा त्यांचा आवडीचा विषय असावा. त्यांचं एक नवं नाटक येतंय, ‘राँग नंबर’ नावाचं. दिग्दर्शक आहेत रमणकुमार, तेच ते ‘तारा’ फेम! पण त्यांचं हे नाटक मात्र नावावरून विनोदी असल्याचं जाणवतं. शिवाय यातल्या इतर कलाकारांची नावंही (म्हणजे अवतार गिल, तनाझ इराणी, डेलनाझ इराणी आणि राजेश पुरी) तसंच काही सांगतात. हिंदी नाटक आणि या कलाकारांना पाहायचं असेल तर रविवारी रात्री आठ वाजता रंगशारदात जायला हरकत नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunday wrong number play