esakal | सुनील शेट्टी बनला खरा हिरो; कोरोना रुग्णांसाठी मोफत वाटतोय ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स

बोलून बातमी शोधा

Suniel Shetty

सुनील शेट्टी बनला खरा हिरो; कोरोना रुग्णांसाठी मोफत वाटतोय ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारताला मोठ्या प्रमाणावर झोडपून काढलं आहे. देशाची ही गंभीर स्थिती पाहता बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीनं जनतेला थेट मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. मोफत ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर वाटणाऱ्या एका मोहिमेत सुनील सामिल झाला आहे. या मदतकार्यात काम करताना आपल्याला खूपच समाधानी वाटत असल्याचं सांगत इतर लोकांनाही त्यानं गरजूंना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

सुनील शेट्टी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, "आपण सध्या एका तपासणी काळातून जात आहोत, पण ज्या प्रकारे लोकांनी एकमेकांच्या मदतीसाठी हातात हात मिळवलेत तोच आपल्यासाठी एक आशेचा किरण आहे. आपण केव्हीएन फाउंडेशनशी जोडलो गेलो असून लोकांना मोफत ऑक्सिजन पुरवण्याचं काम करत आहोत"

सुनील शेट्टीला पाठवू शकता थेट मेसेज

सुनील शेट्टीने म्हटलं की, "मी आपल्या सर्व मित्रांना आणि चाहत्यांना अपील करतो की, जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही मला थेट मेसेज करु शकता. जर आपण अशा लोकांना जाणता ज्यांना मदतीची गरज आहे, किंवा आपल्यालाही या मोहिमेचा भाग व्हायचं आहे तर हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यांच्या मदतीसाठी आमची मदत करा"

मुंबई आणि बंगळुरुत सुरु आहे काम

सुनील आणि केव्हीएन फाउंडेशन सध्या मुंबई आणि बंगळुरुमध्येच काम करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी लोकांना आपलं योगदान देण्याचं आवाहन केलं आहे. नुकतेच अक्षयकुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी देखील १०० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर दान दिले आहेत तसेच यासाठी ते एका नोंदणीकृत एनजीओच्या शोधात आहेत.

ट्विंकल-अक्षय देखील दान करणार १०० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर

ट्विंकलने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन लोकांकडे मदत मागताना म्हटलं की, "कृपया मला व्हेरिफाईड, विश्वसनीय आणि नोंदणीकृत एनजीओची माहिती द्या, जी जनतेला १०० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर वाटण्यास मदत करतील. हे सर्व ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स त्यांच्यापर्यंत थेट युकेवरुन पोहोचवले जातील.