Suniel Shetty : 'आज तो असता तर...' बॉलीवूडच्या अण्णाला सुशांतची येतेय आठवण!

सुनील शेट्टी हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो.
Suniel Shetty
Suniel Shetty esakal

Sunil Shetty remember Sushant Singh Rajput Said : बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंगचे जाणे हे अजूनही चाहत्यांच्या मनाला वेदना देणारे आहे. त्यांच्या निधनानं चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. गेल्या कित्येक महिन्यांपासून चाहते त्यानं घेतलेल्या निर्णयामुळे वेगळ्याच धक्क्यात होते. आता यासगळया परिस्थितीवर बॉलीवूडचा अण्णा सुनील शेट्टी चर्चेत आला आहे. त्याची प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे.

सुनील शेट्टी हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. आपल्याला जे पटते त्यावर अण्णा हा नेहमीच आग्रहानं बोलत आला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यानं बॉलीवूडच्या स्थलांतराविषयी मुद्दा मांडला होता. त्यानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील बॉलीवूडचे स्थलांतर करण्याविषयी काय अडचणी आहेत याविषयी आवाहन केले होते. योगींनी देखील त्याची दखल घेतली होती.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचे निधन झाले. त्यांच्या या निधनानं बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. अशातच सुनील शेट्टीनं सुशांत सिंग आत्महत्या घटनेचा उल्लेख करत एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सुनीलनं नुकत्याच एका मानसिक स्वास्थ्य अॅपचे लॉचिंग केले आहे. त्यावेळी तो बोलत होता. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तो म्हणाला की, मी देखील माझ्या आयुष्यात खूपच वेगळ्या कालखंडातून गेलो आहे. त्यामुळे मला ती वेदना माहिती आहे.

आपण कठीण परिस्थितीला कोणत्या प्रकारे समजून घेतो हे जास्त महत्वाचे आहे. तुम्ही कसा विचार करता, त्या परिस्थितीकडे कसे पाहता हे जास्त सकारात्मक दृष्टीनं अवलोकन करण्यासारखे आहे. तेव्हा नजीकच्या काळात भलेही काही गोष्टी बदलल्या असल्या तरी आयुष्याचं बेसिक काही बदलत नसते. आणि हे आपण समजून घ्यायला हवे.

सुशांतनं काय केलं, नितीन चंद्रकांत देसाई यांची घटना काय सांगते यावर सुनील शेट्टीनं दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय आहे. आता बॉलीवूडचे सेलिब्रेटी तणाव आणि अपयश पचवू शकत नाही. असे म्हणणे चूकीचे आहे. कारण मी बॉलीवूडमधून आलो आहे. त्यात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ कार्यरतही आहे. अशावेळी आपण आपले मानसिक स्वास्थ्य कसे ठेवतो हे महत्वाचे आहे. एक माणूस म्हणून हे सगळे आपण समजू शकतो. पण त्यावर स्वताला संपवायचे हा पर्याय नाही.

एकमेकांशी बोलणे जास्त महत्वाचे. संवाद साधत राहायला पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही. प्रत्येकाला लाईमलाईट हवी आहे. प्रसिद्धीचा झोत हवा आहे. अशावेळी आपण काही गोष्टींबाबत काळजी घ्यायला हवी. तुम्हाला कशाचा त्रास होतो आहे का, कुठली समस्या आहे का, याविषयी एकमेकांशी बोलायला हवे. असे सांगताना सुनील शेट्टीनं आपल्याला सुशांतची खूप आठवण येत असल्याचे म्हटले आहे.

Suniel Shetty
The Hunt For Veerappan Review : बहिणीचा आनंद वीरप्पनला पाहवला नाही, त्यानं तिच्या नवऱ्याला...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com