suniel shetty
suniel shetty Esakal

suniel shetty: 'केएल राहुलसोबत अशी झाली पहिली भेट', खुलासा करत सुनील शेट्टी म्हणला,'घरी येताच पोरीनं दिला शॉक '

Published on

बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाची चर्चाही बरिच रंगली . सर्व विधी आणि परंपरेनुसार दोघेही लग्नबंधनात अडकले. मात्र अभिनेता सुनील शेट्टी हा पहिल्यांदा आपल्या जावायाला कधी कुठे भेटला याबद्दल नुकतच त्याने खुलासा केला आहे.

suniel shetty
Yami Gautam: 'म्हणुन मी बॉलीवूड पार्ट्या', यामी गौतम बॉलीवूडमधील बदलत्या सिनेमाबद्दल म्हणाली...

सुनील शेट्टी द कपिल शर्मा शोमध्ये त्याच्या Kumite 1 Warrior Hunt 1च्या प्रमोशनसाठी गेला होता. यादरम्यान तो केएल राहुलबद्दलही बोलला. त्यांनी सांगितले की, राहुलसोबत त्यांची पहिली भेट 2019 मध्ये विमानतळावर झाली होती. तेव्हाच त्याला समजले की राहुल हा त्याच्या मूळ गाव मंगळुरूचा आहे.

राहुल आपल्या मुलीला ओळखत असल्याचं सुनील शेट्टीला नंतर कळालं आणि दोघांचंही बोलणं झाले. शोमध्ये सुनील म्हणाला, “मी त्याला पहिल्यांदा विमानतळावर भेटलो. तो माझं मूळ गाव मंगळूरचा आहे हे कळाल्यावर मला धक्का बसला. मी त्याचा मोठा चाहता होतो आणि तो चांगली कामगिरी करत असल्याचं पाहून मला आनंद झाला.

suniel shetty
Kiara Advani: 'नव्या नवरीचे नऊ दिवस संपले', कियारा कामावर परतली पण ट्रोल झाली..

जेव्हा मी घरी आलो आणि अथिया आणि पत्नी माना यांना सांगितलं तेव्हा त्यांनी जास्त काही सांगितलं नाही. त्यांनी फक्त एकमेकांकडे पाहिले. नंतर मना माझ्याकडे आली आणि म्हणाली की अथिया आणि राहुल एकमेकांना ओळखतात.

suniel shetty
Mansoor Ali: 'तु सुशांतसारखाच दिसतोय', हृतिकचा स्टंटमॅन मन्सूरने सांगितले, 'त्याच अन् माझं नातं..'

सुनील शेट्टी म्हणाले, 'मला आश्चर्य वाटले की अथियाने मला याबद्दल सांगितलं नाही. मलाही आनंद झाला कारण मी अथियाला नेहमी दक्षिण भारतीय मुलाशी मैत्री करायला सांगायचो. माझा जन्म झाला त्या ठिकाणापासून राहुलचे घर काही किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे हा एक चांगला योगायोग होता.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com