esakal | आसारामबापूची 'लीला' आता मोठ्या पडद्यावर?
sakal

बोलून बातमी शोधा

आसारामबापूची 'लीला' आता मोठ्या पडद्यावर?

- आसारामबापूच्या संपूर्ण जीवनावर आधारित असणार हा चित्रपट.

आसारामबापूची 'लीला' आता मोठ्या पडद्यावर?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसारामबापू सध्या बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत आहे. आता त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या बायोपिकची निर्मिती करणारे सुनील बोहरा हे आसारामबापूवर चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची चर्चा आहे. बोहरा यांचा हा चित्रपट सुशील मुजुमदार यांच्या 'गॉड ऑफ सिन : द कल्ट, 'द क्लाऊट अँड डाऊनफॉल ऑफ आसाराम बापू' या पुस्तकावर आधारित असणार आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे. 

दरम्यान, मागील महिन्यात चित्रपटाच्या निर्मितीचे हक्क बोहरा यांनी खरेदी केले आहेत.त्यानंतर आता आसारामबापूवर चित्रपट येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

loading image