सलमान खानला पाठिंबा दिल्याने ट्रोल करणाऱ्यांना सुनिल ग्रोवरने दिले उत्तर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

सलमान खानचे समर्थन करत सुनिल ग्रोवर याने केलेल्या ट्विटमुळे त्याला ट्रोल करण्यात येत आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत या निधनानंतर सोशल मिडीया मध्ये बॉलिवुड अभिनेता सलमानत खान याच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यासंबंधीत सलमानने त्याच्या चहत्यांना ट्विट करत सुशांतच्या चाहत्यांबद्दल सहानभुती बाळगा आणि त्यांच्याबद्दल अपशब्दांचा वापर करु नका असे अवाहन केले होते. त्यानंतर सलमानच्या या ट्विटचे समर्थन करत कॉमेडीयन तसेच अभिनेता सुनिल ग्रोवर याने केलेल्या ट्विटला देखील नेटकऱ्यांकडून जबरदस्त ट्रोल करण्यात येत आहे. 

 

 

सलमान खानने सुशांतच्या चाहत्यांबद्दल वाईट भाषेचा वापर करु नका असे अवहन केले होते त्यावर ‘मी सलमान सर यांच्यावर प्रेम आणि आदर करतो’ असे ट्विट सुनिल ग्रोवर याने केले होते. हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले तसेच त्याच्या या ट्विटमुळे भडकलेल्या नेटकऱ्यांनी सुनिलला देखील चागलेच ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुनिलने लागोपाठ ट्विट करत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. 

 

 

 

 

सुनिल ने ट्विट करत ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले त्याने लिहीले की, “आता मला पेड ट्रोलर्सना काम देण्यात आनंद वाटायला लागला तर! देवा मला अशा करमणूकीपासून दूर ठेव.” त्यानंतर पुन्हा केल्याल्या दुसऱ्या ट्विटमध्ये सुनिल ने लिहीले की, माहिती आणि सत्य यात फरक असतो, माहीती ही नेहमीच सत्य असत नाही. पण सत्य हे व्यक्तीचा दृष्टीकोन आणि अनुभव यांच्यावर अवलंबून असते.”
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunil grover gives solid reply to troll salman khan supports

Tags
टॉपिकस
Topic Tags: