'लग्नात जाण्यासाठी टॉप ५० मध्ये येणं जरुरी', सुनील ग्रोवरचं मजेशीर ट्विट

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 24 November 2020

केवळ ५० जणांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ करण्याला परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयानंतर सगळीकडे एकच चर्चा रंगलीये. यात कॉमेडिय सुनील ग्रोवरने एक मजेशीर ट्विट केलं आहे.

मुंबई- लॉकडाऊनमध्ये सगळ्यात जास्त फटका बसणा-यांच्या लीस्टमध्ये आहेत ते म्हणजे लग्न ठरलेल्या जोड्या. आता या रखडलेल्या लग्न समारंभाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, केवळ ५० जणांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ करण्याला परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयानंतर सगळीकडे एकच चर्चा रंगलीये. यात कॉमेडिय सुनील ग्रोवरने एक मजेशीर ट्विट केलं आहे.

हे ही वाचा: रामदास पाध्येंनी आदित्य रॉय कपूरसाठी बनवला ‘थ्रीडी बोलका बाहुला’    

सुनिलने ट्विट करत म्हटलंय, “स्पर्धा किती वाढलीये. पहिले फक्त शिक्षण आणि नोकरीसाठीच स्पर्धा होती. पण आता लग्नातल्या पंगतीत बसण्यासाठीदेखील पहिल्या ५० मध्ये आपलं नाव येणं गरजेचं आहे”. सध्या सुनीलचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे.

समाजात घडणाऱ्या अनेक घटनांवर सुनील बिनधास्त व्यक्त होत असतो. अनेकदा तर तो त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरने सगळ्यांना वेड लावतो. सुनील सध्या कॉमेडी शो करत आहे. मात्र लवकरच तो डिजीटल विश्वात पदार्पण करणार आहे. 'सनफ्लॉवर' या सीरिजमध्ये तो झळकणार असून सध्या या सीरिजचं शूटिंग सुरु आहे. 

लॉकडाऊनमधील लग्नांसाठी नियम
१. केवळ ५० जणांच्या उपस्थितीतच लग्न समारंभ होईल
२. ५० पेक्षा अधिक लोक आढळल्यास परवानगी मागणाऱ्यावर कारवाई होणार
३. लग्न समारंभात सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक

sunil grover shared tweet saying competition is going on to go to weddings too  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunil grover shared tweet saying competition is going on to go to weddings too