Sunny Deol Vs Akshay Kumar : सनीच्या बंगल्याची जप्ती अक्षय थांबवणार? 'खिलाडी' करणार 'तारा सिंग'ची मदत

यासगळ्यात सनीच्या बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे त्याच्या बंगल्यावर एका बड्यानं जप्तीची नोटीस काढली आहे.
Sunny Deol Bank Notice Akshay Kumar Tried to Help
Sunny Deol Bank Notice Akshay Kumar Tried to Help esakal

Akshay Kumar paying off Sunny Deol's debts to save his villa? : सनी देओलचा गदर २ प्रदर्शित झाला अन् वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं आतापर्यत तीनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. आता तर हा चित्रपट पाचशे कोटींच्या कमाईकडे वेगानं कूच करतो आहे.

यासगळ्यात सनीच्या बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे त्याच्या बंगल्यावर एका बड्यानं जप्तीची नोटीस काढली आहे. काल पासून या जप्तीच्या नोटीशीच्या बातमीनं चाहत्यांचे,नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशातच बँकेनं आता जप्तीच्या त्या नोटीसीवर स्टे ची ऑर्डरही पास केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सनीच्या बंगल्याचा लिलाव होणार म्हटल्यावर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे. एकीकडे तब्बल २२ वर्षांनी त्याचा गदर प्रेक्षकांच्या भेटीला आला असताना दुसरीकडे बँकेनं त्याच्या प्रॉपर्टीवर टाच आणल्याचे दिसून येत आहे. त्यात त्याच्या मदतीला बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार धावून येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

असंही म्हटलं जातंय की, अक्षय कुमार सनीला त्याच्या बंगल्याच्या जप्तीला रोखण्यासाठी मदत करणार आहे. तो सनीवर असलेले कर्ज भरुन त्याला दिलासा देणार असल्याची चर्चा आहे. इंडिया टु़डेनं मात्र या बातमी आणि चर्चेमध्ये काहीच तथ्य नसल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर सध्या या दोन्ही कलाकारांविषयी वेगवेगळ्या प्रकारे पोस्ट व्हायरल होत आहेत.

सनी आणि अक्षयचा गदर २ अन् ओएमजी २ एकाच दिवशी प्रदर्शित झाले आहेत. त्यात सनीचा गदर बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करतो आहे, तर अक्षयच्या ओएमजीनं देखील शंभर कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सनीवर असलेल्या कर्जाची रक्कम ही ५६ कोटी रुपये आहे. सनीकडून बँकेनं त्या मुळ रकमेवरील व्याज घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र यासगळ्यात अक्षय कुमार हा सनीला मदत करणार अशा ज्या बातम्या समोर येत त्यात कोणतेही तथ्य नाही.

Sunny Deol Bank Notice Akshay Kumar Tried to Help
Ghoomer Review: एक हात नसला म्हणून काय झालं, मनात आणलं तर काहीही अशक्य नाही सांगणारा 'घूमर'

आज बँक ऑफ बडोदानं त्या प्रॉपर्टीच्या इ ऑक्शनच्या नोटीशीला रद्द केले आहे. सनीचा मुंबईतील जुहूमध्ये बंगला आहे. त्यावर काही तांत्रिक बाबींवरुन प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. दरम्यान अक्षय हा सनीच्या मदतीला धावून जाणार अशा चर्चांना उधाण आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com