Gadar 2 : 'खरं सांगा तुम्ही तारा सिंगच्या भूमिकेसाठी किती रुपये घेतले?' शेवटी सनीनं सांगितलं, मला....!

अनिल शर्मा दिग्दर्शित गदर २ मध्ये सनी देओल, उत्कर्ष शर्मा, अमिषा पटेल यांच्या मुख्य भूमिका आहे.
Sunny Deol Fees
Sunny Deol Feesesakal
Updated on

Sunny Deol Fees : सनी देओलच्या गदर २ ने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केल्याचे दिसून आले. २२ वर्षांनी आलेल्या या चित्रपटानं तब्बल ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर त्या चित्रपटामध्ये काम केलेल्या कलाकारांनी किती मानधन घेतले त्याची आकडेवारी समोर आली होती.

अनिल शर्मा दिग्दर्शित गदर २ मध्ये सनी देओल, उत्कर्ष शर्मा, अमिषा पटेल यांच्या मुख्य भूमिका आहे. सनीनं या चित्रपटामध्ये तारा सिंगची भूमिका केली आहे. तर अमिषानं सकीनाची भूमिका साकारत प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. दोन दशकांनंतर आलेल्या या चित्रपटानं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांमध्ये वेगळीच वातावरण निर्मिती केली होती. पूर्ण देशभरात गदर २ चा माहौल होता. त्याला प्रेक्षकांनी दिलेली पसंती खूप काही सांगून जाणारी होती.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

असं म्हटलं जातं की, येणाऱ्या काळात दिग्दर्शकानं आता गदर ३ ची कथा तयार करण्यास घेतली आहे. तो भागही पुढील काही वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी गदर २ ची सक्सेस पार्टी मुंबईमध्ये पार पडली. यावेळी बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते त्याला हजर होते. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षांनी तीनही खान यांनी सनीच्या या सक्सेस पार्टीला हजेरी लावली होती.

आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान यांनी सनी देओल यांचे फोटो यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता सनीनं गदर २ साठी किती मानधन घेतले याची चर्चा सुरु झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनीनं एकट्यानं गदर २ साठी ५० कोटी मानधन घेतल्याची चर्चा आहे. त्यावरुन त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर आलेले नाही. पूर्वी हा आकडा १० ते १५ कोटींच्या घरात होता असे सांगितले जात होते.

गदर २ हिट झाल्यानंतर सनीनं आपल्या मानधनात वाढ केल्याचे सांगण्यात येत आहे. सनीनं यासगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सनी म्हणतो, हे पाहा, यावर मी बोलणे काही उचित नाही. एखाद्या अभिनेत्यानं किती मानधन घेतले हे काही जाहीरपणे सांगण्याची गोष्ट नाही. काही गोष्टी इतक्या मोकळ्यापणानं सांगितल्या जात नाही. त्याला मर्यादा आहेत. मला किती पैसे द्यायचे हे निर्मात्यांनी ठरवायचे. त्यांनी किती कमावले यावर मला किती द्यायचे हे ठरणार आहे. असे सनीनं म्हटले आहे.

Sunny Deol Fees
Jawan: शाहरुख खानच्या जवानमधील 'ती' गोष्ट गोरखपूरमधील सत्य घटनेवर आधारीत, वाचा सविस्तर

मला अमूक आवडत नाही, मला हेच पसंत नाही...अशा माझ्या कोणत्याही प्रकारच्या अटी नाहीत. तेव्हा मला भविष्यात देखील कोणत्याही प्रोजेक्टसमध्ये राहायचे आहे. मी कुणावरही ओझं होऊ नये याची काळजी घेतली जाईल. असेही सनीनं यावेळी सांगितले आहे.

Sunny Deol Fees
Gadar 2 Review : तुम्ही दरवेळी पाकिस्तानात जायचं, तोडफोड करुन भारतात यायचं, प्रेक्षकांनी ते पाहायचं! म्हणजे आम्ही वेडे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com